Diabetes Care: आरोग्यासाठी फायदेशीर असणारे 'हे' पदार्थ मधुमेहींसाठी आहेत विषारी, खाल्ल्यास बिघडेल आरोग्य
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diabetes Care: आरोग्यासाठी फायदेशीर असणारे 'हे' पदार्थ मधुमेहींसाठी आहेत विषारी, खाल्ल्यास बिघडेल आरोग्य

Diabetes Care: आरोग्यासाठी फायदेशीर असणारे 'हे' पदार्थ मधुमेहींसाठी आहेत विषारी, खाल्ल्यास बिघडेल आरोग्य

Nov 24, 2024 01:42 PM IST

Should diabetics eat jaggery or not: नुकतेच आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी असे 3 खाद्यपदार्थ सांगितले आहेत जे इतरांसाठी फायदेशीर असले तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतात.

What foods should diabetics not eat in marathi
What foods should diabetics not eat in marathi (freepik)

What foods should diabetics not eat in marathi:  बदलती जीवनशैली आणि अति जंक फूड खाल्ल्याने आजार सतत शरीरावर आक्रमण करत आहेत. भारतातील स्त्री-पुरुषांमध्ये मधुमेहाचे प्रमाण जवळपास दुप्पट झाल्याचेही अहवाल सांगतात. असं म्हणतात की, हा आजार एकदा कुणाला झाला की तो आयुष्यभर राहतो. त्याचबरोबर या आजाराबाबत निष्काळजीपणा केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. नुकतेच आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी असे 3 खाद्यपदार्थ सांगितले आहेत जे इतरांसाठी फायदेशीर असले तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतात. जाणून घ्या...

फायदेशीर अन्नपदार्थ जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी विषासमान आहेत-

१) दही

आयुर्वेदानुसार दही हे उष्ण असते. हे पचायला जड आणि गुणधर्माने पातळ-चिकट असते. यामुळे शरीरातील कफ दोष वाढतो. कफ वाढला की वजन वाढते आणि चयापचय बिघडते. अशा परिस्थितीत तुम्हाला आळशी वाटू शकते. जेव्हा कफ दोष वाढतो तेव्हा पौष्टिकतेची कमतरता असू शकते, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स देखील वाढू शकतात. अशा परिस्थितीत मधुमेह असलेल्यांनी दही टाळणेच उत्तम. काहीवेळा तुम्ही दह्याऐवजी ताक पिऊ शकता.

२) गूळ-

मधुमेह असलेल्यांनी साखर टाळावी, पण तुम्हाला माहित आहे का की साखरेपेक्षा जास्त प्रमाणात गूळ खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गूळ साखरेपेक्षा 100 टक्के आरोग्यदायी आहे कारण तो रसायनांशिवाय नैसर्गिक प्रक्रियेद्वारे बनवला जातो आणि तो पौष्टिकतेने परिपूर्ण असतो. त्यामुळे तुम्ही गूळ खाऊ शकता पण मर्यादित प्रमाणात. कारण जास्त खाणे हानिकारक ठरू शकते.

3) पांढरे मीठ-

मधुमेह असलेल्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असू शकते. त्यामुळे हृदयविकार, पक्षाघात, किडनीच्या आजारांचा धोका वाढतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मिठाचा वापर मर्यादित करा. किंवा रॉक सॉल्ट, हिमालयीन गुलाबी मीठ वापरा. हे तुम्हाला उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेहाशी संबंधित इतर समस्या टाळण्यास किंवा नियंत्रित करण्यास मदत करू शकते.

कमी प्रमाणात खाणे योग्य आहे की पूर्णपणे टाळावे?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे अन्नपदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की, आपण ते कधीही खाऊ शकत नाही. तुम्ही या गोष्टी अधूनमधून मर्यादित प्रमाणात खाऊ शकता. यासोबतच या तज्ज्ञाने असेही स्पष्ट केले आहे की, त्यांनी या खाद्यपदार्थांची यादी स्वत: बनवली नाही, तर या गोष्टी आयुर्वेदिक क्लासिक्समध्ये खास लिहिल्या गेल्या आहेत.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner