Diabetes care : मधुमेहाच्या रुग्णांनी देशी तूप खावे की नाही? आहारातून काढून टाकण्याआधी जाणून घ्या!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diabetes care : मधुमेहाच्या रुग्णांनी देशी तूप खावे की नाही? आहारातून काढून टाकण्याआधी जाणून घ्या!

Diabetes care : मधुमेहाच्या रुग्णांनी देशी तूप खावे की नाही? आहारातून काढून टाकण्याआधी जाणून घ्या!

Nov 25, 2024 11:55 AM IST

Desi Ghee ForDiabetes:मधुमेहासारख्या आजारांमध्ये तुपाचे सेवन करावे की नाही, याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तूप फायदेशीर ठरू शकते का?, हा देखील एक मोठा प्रश्न असतो.

Desi Ghee For Diabetes
Desi Ghee For Diabetes

Desi Ghee For Diabetes In Marathi : तूप हा भारतीय आहारातील सर्वात आवश्यक आणि महत्त्वाचा घटक मानला जातो. परंतु, मधुमेहासारख्या आजारांमध्ये तुपाचे सेवन करावे की नाही, याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तूप फायदेशीर ठरू शकते का?, हा देखील एक मोठा प्रश्न असतो. मात्र, देशी तूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण ते खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारचे चांगले फॅट्स मिळतात. प्रथिने आणि कॅल्शियम यांची कमतरता देखील भरून निघते. देशी तूप आपली चयापचय क्रिया मजबूत करते. चला जाणून घेऊया मधुमेहाचे रुग्ण देसी तूप खाऊ शकतात की, नाही...

मधुमेहाच्या रुग्णांसाठी तूप किती फायदेशीर आहे?

देशी तूप खाणे विशेषतः गाईचे देशी तूप खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. या तुपाचे अनेक सकारात्मक प्रभाव आहेत, जे या लोकांसाठी फायदेशीर मानले जातात.

तूप का खावे?

उर्जा स्त्रोत : तुपामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे शरीरासाठी चांगला ऊर्जा स्त्रोत असतात. तथापि, या चरबीचे योग्य प्रमाणात सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढण्याऐवजी हळूहळू वाढते. देशी तुपामुळे इंसुलिनची पातळीही नियंत्रित राहते.

इंसुलिनचे व्यवस्थापन : काही आरोग्य अहवालात असे आढळून आले आहे की, तुपात असलेले ओमेगा-३ आणि ९ फॅटी ऍसिड शरीरातील इन्सुलिन पातळी सुधारण्यास मदत करतात. शरीरात इन्सुलिनचा योग्य परिणाम झाला, तर रक्तातील साखर नियंत्रित करणे सोपे जाते.

जळजळ कमी करते : क्लॅरिफाईड बटर ॲसिड नावाचा घटक तुपात आढळतो, जो शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतो. मधुमेहामुळे शरीरात सूज वाढते. गायीचे देशी तूप ही सूज आणि जळजळ कमी होण्यास मदत करू शकते.

Diabetes Care: आरोग्यासाठी फायदेशीर असणारे 'हे' पदार्थ मधुमेहींसाठी आहेत विषारी, खाल्ल्यास बिघडेल आरोग्य

हृदयाचे आरोग्य : देशी तुपात सॅच्युरेटेड फॅट्स असतात, पण जर तुम्ही ते मर्यादित प्रमाणात खाल्ले तर ते तुमच्या हृदयाला इजा करत नाही. अनेकदा मधुमेहाच्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो, त्यामुळे तूप खाणे त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तूप रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.

आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर

देशी तूप आतड्यांतील हार्मोन्स सुधारते, ज्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. देसी तूप खाल्ल्याने एकंदर आरोग्य सुधारते आणि पचनशक्तीही चांगली राहते. पचनशक्ती मजबूत असल्याने रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.

मधुमेहाच्या रुग्णांनी तूप कसे खावे?

तूप खाण्याचे अनेक मार्ग असले तरी, चपाती, भाकरी किंवा भातामध्ये तूप मिसळून खाणे अधिक फायदेशीर ठरेल. विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांसाठी, कारण आहारातील हे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवतात. या प्रक्रियेत देशी तूप मिसळल्यास याचा वेग कमी होतो आणि साखर हळूहळू रक्तात विरघळते.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner