Dengue symptoms: गेल्या काही दशकांमध्ये भारतात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आणि हे असेच सुरू राहण्याची शक्यता आहे. डेंग्यू हा डासांपासून पसरणाऱ्या धोकादायक आजारांपैकी एक आहे. ज्याची काळजी न घेतल्यास ते प्राणघातक ठरू शकते. महाराष्ट्रासोबतच दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतात डेंग्यूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. बदलत्या हवामानासह डासांची संख्या वाढल्याने रुग्ण वाढत आहेत. डेंग्यू टाळण्यासाठी, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल सर्व काही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच याबाबत जाणून घेणार आहोत.
"द लॅन्सेट" मध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार, भारतात जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान डेंग्यूचे ११०,४७३ रुग्ण आढळले आहेत. भारतीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये पंचकुलामध्ये ५०३ डेंग्यूची प्रकरणे, उत्तर प्रदेशमध्ये ३४१ आणि दिल्लीत ३८१ रुग्ण आढळले आहेत.तर महानगरपालिकांच्या माहितीनुसार महाराष्ट्रात २६३६ प्रकरणे आढळली आहेत.
तज्ज्ञांच्या मते, या बदलत्या ऋतूमध्ये सर्दी आणि ताप ही एक सामान्य समस्या आहे. परंतु या परिस्थितीत आपण आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहणे अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच वेळा, किरकोळ तापाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते, परंतु हे डेंग्यूचे लक्षण आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
डेंग्यू हा एक गंभीर आजार आहे. जो एडिस डासाच्या चाव्याव्दारे किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो. डेंग्यू तापाची लक्षणे साधारणतः संक्रमित डास चावल्यानंतर ४ ते १० दिवसांनी दिसतात. आणि २ ते ७ दिवस टिकतात.
-अचानक जास्त ताप, जो १०४°F (४०°C) पर्यंत पोहोचू शकतो.
-तीव्र डोकेदुखी होऊ शकते, विशेषत: डोळ्यांच्या मागे वेदना.
-सांधे आणि स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात, म्हणूनच त्याला "ब्रेकबोन फीवर" असेही म्हणतात.
-मळमळ आणि उलट्या जाणवतात, भूक कमी होते.
-हलके काम करूनही अति थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
-तापानंतर काही दिवसांनी त्वचेवर पुरळ उठू शकतात.
-शरीरातील ग्रंथींमध्ये सूज येणे.
-तीव्र पोटदुखी
-सतत उलट्या होणे
-जलद श्वास घेणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे
-नाकातून रक्त येणे, हिरड्यांमधून रक्त येणे किंवा शरीरावर निळ्या खुणा सहज तयार होणे.
-सतत अस्वस्थ राहणे
-उलट्या किंवा शौचातून रक्त पडणे
-खूप तहान लागणे
-फिकट गुलाबी आणि थंड त्वचा
-व्हिटॅमिन सी समृद्ध फळे आणि भाज्या (संत्री, लिंबू, पपई, हिरव्या पालेभाज्या)
-लोहयुक्त अन्न (डाळी, यकृत, मांस)
-व्हिटॅमिन के समृध्द अन्न (स्प्राउट्स, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या)
-ताकद देणारे अन्न (दूध, तांदूळ, बटाटे)
-द्रव (पाणी, नारळ पाणी, पांढरा तांदूळ दलिया)
-गडद रंगाचे अन्न आणि पेय उदाहरणार्थ, चॉकलेट, लाल किंवा जांभळा ज्यूस. गडद रंगाचे पदार्थ साधारणपणे पचायला जड असतात. डेंग्यूमध्ये अनेकदा डिहायड्रेशनची समस्या असते. गडद रंगाच्या अन्नामध्ये जास्त प्रमाणात मीठ आणि साखर असू शकते, जे पाणी शोषणात अडथळा आणू शकते. त्यामुळे या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
-डेंग्यूच्या तापात कॅफिनयुक्त पदार्थ जसे की कॉफी, चहा, एनर्जी ड्रिंक्स टाळण्याचा सल्ला दिला जातो.
-मसालेदार पदार्थ- खरं तर, मसालेदार अन्न पचनक्रिया खराब करू शकते. मसाल्यांच्या सेवनाने शरीरातील जळजळ वाढू शकते.
-तेलकट पदार्थ- तेलकट अन्न पचण्यास कठीण आहे, ज्यामुळे भूक कमी होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)