Vitamin D3: व्हिटॅमिन D3 च्या कमतरतेमुळे होतात 'हे' आजार, जाणून घ्या उपाय
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Vitamin D3: व्हिटॅमिन D3 च्या कमतरतेमुळे होतात 'हे' आजार, जाणून घ्या उपाय

Vitamin D3: व्हिटॅमिन D3 च्या कमतरतेमुळे होतात 'हे' आजार, जाणून घ्या उपाय

Oct 27, 2024 10:22 AM IST

Importance of Vitamin D3: व्हिटॅमिन डी३ आपल्या शरीरासाठी देखील खूप महत्वाचे आहे शरीरात व्हिटॅमिन डी ३ च्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Effects of Vitamin D3 Deficiency
Effects of Vitamin D3 Deficiency (freepik)

Effects of Vitamin D3 Deficiency:  शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराला सर्व पोषक तत्वे, जीवनसत्त्वे, खनिजे यांची गरज असते. त्यातील एक म्हणजे व्हिटॅमिन डी३. व्हिटॅमिन डी३ आपल्या शरीरासाठी देखील खूप महत्वाचे आहे शरीरात व्हिटॅमिन डी ३ च्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज आपण या लेखात व्हिटॅमिन डी 3 च्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांबाबत जाणून घेणार आहोत.

व्हिटॅमिन डी ३ च्या कमतरतेमुळे होणारे रोग-

हाडांचे आरोग्य-

व्हिटॅमिन डी ३ च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि त्यांची वाढ खुंटते. म्हणूनच व्हिटॅमिन डी ३ असलेले पदार्थ खाणे हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. जेणेकरून आपली हाडे मजबूत राहतील. आणि हाडांना कोणतीही इजा होणार नाही.

स्नायू होतात कमकुवत-

शरीरात व्हिटॅमिन डी ३ पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे, स्नायू कमकुवत होण्याची शक्यता देखील वाढते. कमकुवत स्नायूंमुळे, तुम्हाला चालणे आणि तुमची दैनंदिन कामे करण्यात अडचण येऊ लागते. स्नायू कमकुवत झाल्यामुळे, लहान वयातच तुम्हाला वेदना आणि हातापायात कळा येऊ लागतात.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य-

हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी ३ देखील खूप महत्वाचे आहे. शरीरात व्हिटॅमिन डी ३ च्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

रोगप्रतिकारक शक्ती-

व्हिटॅमिन डी ३ शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. शरीरात त्याच्या कमतरतेमुळे, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे व्यक्ती वारंवार आजारी पडू लागते. म्हणून व्हिटॅमिन डी ३ असलेल्या पदार्थांचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे.

ताणतणाव-

शरीरात व्हिटॅमिन डी ३ ची कमतरता केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करते. त्याच्या कमतरतेमुळे तणाव आणि नैराश्यासारख्या समस्यांचा धोका वाढतो. म्हणूनच व्हिटॅमिन डी ३ हे मानसिक आरोग्यासाठी देखील महत्त्वाचे आहे.

व्हिटॅमिन डी ३ ची कमतरता असल्यास काय खावे

शरीरात व्हिटॅमिन डी३ ची कमतरता असल्यास, सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन, अंड्यातील पिवळ बलक, ओट्स, नाचणी, वनस्पती आधारित दूध इत्यादीसारख्या चरबीयुक्त माशांचे सेवन करून आपण शरीरात व्हिटॅमिन डी३ मिळवू शकता. हे पदार्थ खाल्यास कोणतीही कमतरता भासणार नाही. आणि तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

 

Whats_app_banner