मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pregnancy Tips: प्रेग्नेंसीच्या सहाव्या महिन्यात हाय हील्स घालताना दिसली दीपिका पदुकोण, जाणून घ्या का टाळावे हील्स

Pregnancy Tips: प्रेग्नेंसीच्या सहाव्या महिन्यात हाय हील्स घालताना दिसली दीपिका पदुकोण, जाणून घ्या का टाळावे हील्स

Jun 21, 2024 10:00 PM IST

Deepika Padukone: दीपिका पदुकोणने पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी बेबी बंप फ्लॉन्ट केला. पण तिचे हाय हील्स पाहून सोशल मीडियावर जोरदार कमेंट्स येत आहेत. जाणून घ्या प्रेग्नेंसीच्या तिसऱ्या तिमाहीत हाय हील्स का घालू नयेत.

दीपिका पदुकोण - प्रेग्नेंसीमध्ये हाय हील्स का टाळावे
दीपिका पदुकोण - प्रेग्नेंसीमध्ये हाय हील्स का टाळावे (hindustan)

Avoid High Heels in Last Trimester During Pregnancy: दीपिका पदुकोण नुकतीच कल्की चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली होती. जिथे ती ब्लॅक कलरच्या बॉडी फिटिंग ड्रेसमध्ये नेहमीप्रमाणेच हॉट आणि गॉर्जियस दिसत आहे. त्याचबरोबर पायातील मॅचिंग ब्लॅक हील्स तिच्या लुकला कॉम्प्लिमेंट करत आहेत. मात्र, गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात एवढ्या हाय हील्स घालणे धोक्याचे ठरू शकते. तिचे हाय हील्स पाहून सोशल मीडियावर जोरदार कमेंट्स येत आहेत. अनेकदा डॉक्टर हील्स घालायला पूर्णपणे नकार देतात. जर तुम्हाला तरीही गरोदरपणात हील्स घालायची असतील तर त्यामुळे होणारे नुकसान आणि जोखीम याबद्दलही जाणून घ्या. जाणून घ्या प्रेग्नेंसीमध्ये डॉक्टर हिल्स घालण्यास नकार का देतात?

प्रेग्नेंसीमध्ये हाय हील्स टाळण्याचे कारणं

पायांमध्ये वेदना

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत जेव्हा तुम्ही हाय हील्स घालता, तेव्हा यामुळे काल्फ मसल्स ताणले जातात आणि त्यांच्यातील दाब वाढतो. ज्यामुळे पायात तीव्र वेदना होऊ लागतात.

ट्रेंडिंग न्यूज

पाठदुखी

गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात बाळाचे वजन वाढते. अशा वेळी कंबरेवर अतिरिक्त वजन येते. अशावेळी जेव्हा तुम्ही हिल्स घालता तेव्हा यामुळे कंबरेचा आधार कमी होतो आणि नसांवर ताण येतो. ज्यामुळे पेल्विस आणि कमरेच्या हाडांमध्ये वेदना होऊ लागतात.

पडण्याची भीती

हिल्स घातल्याने दुखण्याची भीती तर असतेच पण काही वेळा संतुलन बिघडल्याने घसरून पडण्याची भीतीही असते. ज्यामुळे इजा तसेच गर्भपात होण्याचा धोका असू शकतो.

चालण्यास त्रास

गरोदरपणात वजन वाढते आणि चालही बदलते. अशावेळी जेव्हा तुम्ही हाय हील्स घालता तेव्हा टाचांना शरीराचे सर्व वजन हाताळणे अवघड जाते. ज्यामुळे चालणे कठीण होते.

पायावर सूज

हाय हील्समुळे पायात फ्लूइड जमा होऊ लागतो. ज्यामुळे पायांवर सूज येते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel