पुणे: दातांमध्ये पोकळी आणि हिरड्यांच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांची संख्या वाढत चालली आहे. दहा मुलांपैकी किमान दोन मुलांना दात किडण्याच्या समस्येने ग्रासले आहे. त्यात दुधाचे दात किडण्याचे प्रमाण अधिक आहे. हे दात आता पडणारच आहेत म्हणून त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते, ते चुकीचे असून हे दात किडून नाही तर नैसर्गिकपणे पडणे गरजेचे आहे. आपल्या मुलांना नियमित डेन्टल चेकअपसाठी घेऊन जाणे व दुधाच्या दातांच्या कुठल्याही समस्या असल्यास त्वरित दंतचिकित्सकांचा सल्ला घेणे गरजेचे आहे .
रात्रीच्या वेळी अनेक पालक आपल्या बाळांना बाटलीत दूध किंवा ज्यूस घालून पाजतात व मुलं ती बाटली तोंडातच ठेवून झोपून जातात. असे केल्यास ते गोड पदार्थ रात्रभर बाळाच्या तोंडातील दातांवर साठून राहतात. तोंडातील जिवाणू याच गोड पदार्थांना आपला आहार म्हणून वापरतात, जिवाणू दातांवर हल्ला करून अम्लपदार्थ सोडतात ज्यामुळे दात कमजोर बनतात व किडू लागतात. हा प्रकार रोज घडल्याने दुधाचे दात पूर्णपणे नष्ट होतात.
डॉ. अभिनव तळेकर( बालरोग आणि प्रतिबंधात्मक दंतचिकित्सक) अंकुरा हॉस्पिटल सांगतात की, ओपीडीमध्ये मला भेट देणाऱ्या ५ ते १५ वर्षे वयोगटातील १० पैकी ७ मुलांना आता ऑर्थोडॉन्टिक समस्या सतावतात. लहान मुलांच्या दंत समस्यांकडे सुरुवातीच्या टप्प्यात लक्ष न दिल्याने कायमचे दात वाकडे येणे, जर दूधाच्या दातांमध्ये जागा नसेल किंवा हे दात वेडेवाकडे असतील तर पक्क्या दातांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही, हे त्याचं लक्षण आहे. यासाठी दंत चिकित्साकडे चेकअप करून घेणं गरजेचं आहे. जर वेळीच उपचार केले नाहीत तर त्यामुळे दुधाचे दात लवकर पडू शकतात.
डॉ. अभिनव तळेकर पुढे सांगतात की, अंकुरा हॉस्पिटलने लहान मुलांच्या वाढत्या दातांच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे येथील रास्ता पेठ येथे स्पेशलाइज्ड पेडियाट्रिक डेंटल ओपीडी क्लिनिक सुरु केले असून आमचे हे क्लिनिक आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे आणि १५ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी प्रतिबंधात्मक काळजी ते प्रगत दंत उपचारांपर्यंत सेवा प्रदान करण्यासाठी अनुभवी तज्ञ याठिकाणी उपलब्घ आहेत. वेळीच निदान आणि उपचार हे दातांच्या गंभीर समस्या टाळू शकते.
दातांचे आरोग्य हे मुलाच्या एकूण आरोग्याचा एक आवश्यक भाग आहे, तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. इतर आरोग्य समस्यांप्रमाणेच, दीर्घकालीन गुंतागुंत टाळण्यासाठी दंत समस्यांवर वेळीच उपचार केले पाहिजेत. असे डॉ. उमेश वैद्य (ग्रूप डायरेक्टर आणि नवजात शिशु विभागाचे प्रमुख)अंकुरा हॉस्पिटल यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीपासूनच मुलांचे दात स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांना दिवसातून दोनदा चांगल्या टूथपेस्टने ब्रश करायला सांगा. बाळाच्या दातांवर काळे किंवा पांढरे डाग पडणे, दात दुखणे, मुलांची चिडचिड होणे, दातांना थंड पदार्थांचा त्रास होणे, तोंडातून दुर्गंधी येणे तसेच दात किडन्याची लक्षणे दिसल्यास त्वरीत दंतचिकीत्सकांचा सल्ला घ्या असेही डॉ. उमेश वैद्य यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या