Daughter's Day 2024: मुलींच्या वागण्याशी संबंधित 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?-daughters day 2024 do you these amazing behavioral facts about daughters ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Daughter's Day 2024: मुलींच्या वागण्याशी संबंधित 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Daughter's Day 2024: मुलींच्या वागण्याशी संबंधित 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Sep 22, 2024 09:49 PM IST

Daughter's Behaviour: दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी डॉटर्स डे साजरा केला जातो. या खास दिवशी तुम्हाला मुलींशी संबंधित या खास गोष्टी माहित असाव्यात, ज्या त्यांच्या वागणुकीचा भाग असतात

Daughter's Day- मुलींच्या वागण्याशी संबंधित खास गोष्टी
Daughter's Day- मुलींच्या वागण्याशी संबंधित खास गोष्टी (unsplash)

Amazing Behavioral Facts About Daughters : भारतात सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी डॉटर्स डे (daughters day) साजरा केला जातो. यंदा २२ सप्टेंबरला रविवार आहे. हा खास दिवस मुलींना समर्पित आहे. तसं पाहिलं तर जागतिक स्तरावरही डॉटर्स डे साजरा केला जातो. पण भारतात हा दिवस साजरा करण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. याचे कारण भारतीय समाज आहे, जिथे मुलगा होणे खूप महत्वाचे आहे. भारतातील अनेक भागांत मुलींच्या जन्मापूर्वीच त्यांची हत्या केली जात असे. परंतु कडक कायदे आणि समाजातील बदलांचा परिणाम असा झाला आहे की अनेक जोडपी आता सिंगल फिमेल चाइल्डचे पालक आहेत. तसं तर मुलगा आणि मुलगी दोघेही सर्वांना प्रिय आहेत. पण जर तुम्ही एखाद्या मुलीचे पालक असाल तर तिच्या वागण्याशी संबंधित या खास गोष्टी तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.

न सांगता समजते

मुलींना अनेकदा आई-वडिल जे बोलत नाहीत त्या गोष्टी समजतात. मुलं तसे करू शकत नाहीत. खरं तर मुली कुठलीही परिस्थिती खूप खोलवर समजून घेतात. अशावेळी पालकांची प्रत्येक समस्या न बोलता समजून घेतली जाते.

पालकांशी असते खोल भावनिक नातं

मुली खूप भावूक असतात आणि मेंदूपेक्षा मनाने जास्त विचार करतात. त्यांचे भावनिक वर्तन पालकांशी खोलवर जोडलेले असते. त्यामुळे मुलींच्या पालकांना आपल्या मुलीला जास्त समजावून सांगावे लागत नाही. बहुतेक घरांमध्ये मुली आईच्या बेस्ट फ्रेंड असतात. आईची सीक्रेट असोत किंवा वडिलांच्या नजरेतली समस्या असो, दोन्ही मुली सहज पाहतात आणि समजून घेतात.

डिमांड करत नाही

मुलं जिथे नेहमीच हट्टी आणि डिमांड करणारे असतात. तिथेच मुली सहसा हट्टी किंवा डिमांड करत नाहीत. त्यांच्या वागण्यात समाधान असते. जे त्याच्या भावांमध्ये मुळीच नसते.

काळजी घेणाऱ्या

मुली केअरिंग असतात. आणि केवळ पालकांच्या समस्या समजून घेत नाहीत तर त्यावर मात करण्याचा प्रयत्न देखील करतात. त्यामुळे मुलीच्या आईला आजारी पडण्याची चिंता कधीच नसते. कारण त्यांना माहित आहे की त्यांची मुलगी सर्व काही सांभाळेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner