Daughter day 2024: मुलीसाठी जोडीदार निवडताना पालकांनी 'या' ४ गोष्टी लक्षात ठेवाव्या, अथवा आयुष्यभर होऊ शकतो पश्चाताप-daughter day 2024 parents should remember these 4 things while choosing a partner for their daughter ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Daughter day 2024: मुलीसाठी जोडीदार निवडताना पालकांनी 'या' ४ गोष्टी लक्षात ठेवाव्या, अथवा आयुष्यभर होऊ शकतो पश्चाताप

Daughter day 2024: मुलीसाठी जोडीदार निवडताना पालकांनी 'या' ४ गोष्टी लक्षात ठेवाव्या, अथवा आयुष्यभर होऊ शकतो पश्चाताप

Sep 22, 2024 04:20 PM IST

Happy Daughter's Day: लाडक्या मुलीसाठी चांगला जोडीदार शोधण्याची वेळ येते, तेव्हा पालक आपला पूर्ण जोर लावतात. आपल्या हृदयाचा तुकडा एखाद्या परक्या घरी पाठवताना सासरच्या घरामध्ये आपल्याइतकेच प्रेम लेकीला मिळावे असे कोणत्या पालकाला वाटणार नाही.

Daughter's Day Special Tips
Daughter's Day Special Tips (freepik)

 Daughter's Day Special Tips:  लग्न हा आयुष्यातील असा महत्त्वाचा निर्णय आहे ज्यात थोडीशी चूकही आयुष्यासाठी पश्चाताप बनू शकते. अशावेळी प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी योग्य जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करत असतात. विशेषत: जेव्हा आपल्या लाडक्या मुलीसाठी चांगला जोडीदार शोधण्याची वेळ येते, तेव्हा पालक आपला पूर्ण जोर लावतात. आपल्या हृदयाचा तुकडा एखाद्या परक्या घरी पाठवताना सासरच्या घरामध्ये आपल्याइतकेच प्रेम लेकीला मिळावे असे कोणत्या पालकाला वाटणार नाही. चांगल्या आणि उदात्त जोडीदारासोबत आयुष्य आनंदात व्यतीत होते. तर वाईट जोडीदार आयुष्य उध्वस्त करतो. जर तुम्हीही तुमच्या मुलीसाठी जोडीदाराच्या शोधात असाल तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

आपल्या मुलीसाठी चांगला जोडीदार शोधताना मुलगा स्वयंपूर्ण आहे का हे लक्षात ठेवा. मुलाचे कुटुंब किती श्रीमंत आहे, त्यांच्याकडे किती जमीन आणि मालमत्ता आहे हे महत्त्वाचे नाही. किंबहुना त्या मुलाने आपल्या क्षमतेच्या जोरावर काही साध्य केले आहे की नाही, हे महत्त्वाचे आहे. त्याला आयुष्याची खोली किती समजते आणि स्वत:हून खाली पडून कसे उठायचे हे त्याला माहित आहे का? अशी मुले प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभी राहतात आणि आयुष्यअधिक चांगल्याप्रकारे समजून घेतात.

माणसाचं सौंदर्य चेहऱ्यावर नाही तर त्याच्या स्वभावात असतं. चांगले रूप पाहून तुम्ही थोड्या काळासाठी आकर्षित होऊ शकता. पण माणसाचा चांगुलपणाच आयुष्यभर उपयोगी पडतो. अशावेळी मुलाच्या रूपापेक्षा त्याच्या स्वभावाकडे जास्त लक्ष द्या. त्यांचा संभाषणाचा सूर, वागणे, लोकांशी त्यांचे बोलणे या सर्व गोष्टी तपासून पहा. लग्न हे घाईगडबडीत करण्याची गोष्ट नाही. त्यामुळे थोडा वेळ काढून मुलाची नीट परीक्षा घ्या.

पुरुषाचा स्त्रियांबद्दलचा विचार बऱ्याच अंशी त्याचे वर्तन ठरवतो. जर तो मुलींना कोणत्याही प्रकारे कमी लेखत असेल किंवा मुलींना एका विशिष्ट मर्यादेने बांधून ठेवले पाहिजे असे मानत असेल तर अशा विचारसरणीच्या मुलांपासून दूर रहा. अशी मुले आपल्या मुलीला काही दिवस आनंदी ठेवू शकतात. पण तिला खाली खेचण्याचे काम ते नेहमीच करतील. आपल्या मुलीला त्याच्यापेक्षा वरचढत ठरताना पाहून कदाचित त्यांना आनंदही होणार नाही. त्यामुळे नेहमी समतेवर विश्वास ठेवणारा आणि आपल्या मुलीला अर्धांगिनीचा दर्जा देणारा मुलगा निवडा.

मुलाला भेटायला गेलात तर त्याचीच नव्हे तर त्याच्या घरच्यांचीही पडताळणी करा. सहसा कुटुंबाकडे पाहून त्या घराचं वातावरण कसं असतं याचा बराच अंदाज बांधता येतो. मुलाच्या वागण्यातूनही या गोष्टी स्पष्ट दिसतात. जर कुटुंबातील सदस्य खूप ढोंगी, बनावट असतील तर तुमच्या मुलीला अशा कुटुंबात जुळवून घेण्यात खूप अडचण येऊ शकते. याशिवाय घरातील स्त्री-पुरुषांच्या वागणुकीचाही विचार करा.

 

Whats_app_banner