Dasara Recipe: कडाकण्या मऊ किंवा तेलकट होतात, 'या' रेसिपीने होतील एकदम खुसखुशीत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dasara Recipe: कडाकण्या मऊ किंवा तेलकट होतात, 'या' रेसिपीने होतील एकदम खुसखुशीत

Dasara Recipe: कडाकण्या मऊ किंवा तेलकट होतात, 'या' रेसिपीने होतील एकदम खुसखुशीत

Oct 08, 2024 01:37 PM IST

Dasara recipe 2024: पारंपरिक पद्धत म्हटलं की यामध्ये आवर्जून काही खाद्यपदार्थ येतात. मग ते करंजी असो किंवा कडाकणी असो. दसऱ्याच्या उत्सवात कडाकणी हा पारंपरिक पदार्थ मुख्य असतो.

Dasara 2024- How to make Kadakani
Dasara 2024- How to make Kadakani

How to make Kadakani:  भारतातही सणासुदीला सुरुवात झाली आहे. देशभरात लोक घरोघरी दुर्गापूजा मोठ्या थाटामाटात साजरी करत आहेत. आणि आता लोक पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा करण्याची तयारी करत आहेत. पारंपरिक पद्धत म्हटलं की यामध्ये आवर्जून काही खाद्यपदार्थ येतात. मग ते करंजी असो किंवा कडाकणी असो. दसऱ्याच्या उत्सवात कडाकणी हा पारंपरिक पदार्थ मुख्य असतो. घरातील स्त्रिया आता कडाकणी बनवण्याची तयारी करत अनेक नवविवाहित मुलींना किंवा स्त्रियांनासुद्धा कडाकणी करणे थोडेसे कठीण जाते. काही वेळा कडाकणी मऊ पडतात, तर काही वेळा कडाकणी तेलकट होतात. अशावेळी खुसखुशीत कडकणी बनवण्यासाठी नेमकं काय करायचं? आज आम्ही तुमच्या एक पारंपरिक आणि परफेक्ट रेसिपी आणली आहे. चला तर मग पाहूया ही सोपी रेसिपी...

कडाकण्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

१ कप - गव्हाचे पीठ

१ वाटी - चण्याचे पीठ (बेसन)

१/२ कप -  गूळ

१/२ कप - गरम पाणी

१ चमचा - तूप किंवा तेल

-चिमूटभर मीठ

-वेलची पूड

कडाकण्या बनवण्याची रेसिपी-

-कडाकण्या बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात गूळ घेऊन त्यात पाणी घालून ठेवावे. जेणेकरून पाण्यात गूळ लवकर विरघळेल.

-आता एका पसरत भांड्यात किंवा परातीत गव्हाचे पीठ, बेसनाचे पीठ एकत्र मिसळून घ्यावे.

-या मिश्रणात हळद, मीठ, वेलची पूड आणि तेल किंवा तुपाचे मोहन घालून पीठ एकजीव करून घ्यावे.

-नंतर या पीठ गुळाचे पाणी ओतून पीठ चांगले मऊसूत मळून घ्यावे.

-मळून घेतलेले पीठ झाकून एक अर्धा तास ठेऊन द्यावे. जेणेकरून पिठात सर्व गोष्टी चांगल्या मुराव्यात.

-आता पिठाचे लहान-लहान गोळे घेऊन तुम्ही ते पुरीसारखे लाटून घ्यावे.

-कडाकण्या तळताना त्या मंद आंचेवर तळव्यात. जेणेकरून करपणार नाहीत किंवा कच्याही राहणार नाहीत.

-कडकण्याला तुम्ही इतर कोणताही आकार देऊ शकता.

-अशाप्रकारे तुमच्या खुसखुशीत कडाकण्या तयार आहेत.

Whats_app_banner