Dussehra special makeup Tips: मेकअपचा वापर हा बहुतांश महिलांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. तथापि, सुरुवातीला एक परफेक्ट मेकअप लुक कॅरी करणे अनेक महिलांसाठी कठीण काम असते. विशेषतः पहिल्यांदा मेकअप करणाऱ्या स्त्रियां सहसा मेकअप प्रॉडक्ट आणि मेकअप करण्याच्या पद्धतींबद्दल गोंधळलेल्या दिसतात. अशा परिस्थितीत, महिलांना हवे असल्यास, त्या काही सोप्या मेकअप टिप्स वापरून पाहू शकतात आणि काही मिनिटांत उत्कृष्ट मेकअप लुक मिळवू शकतात. सणासुदीच्या काळात महिलांना पटकन मेकअप करण्याची गरज भासते. अशावेळी त्या पार्लरला जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच आता तुम्ही दसऱ्यासाठी पटकन स्वतःचा मेकअप करू शकता. त्यासाठी आम्ही काही जबरदस्त टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.
महिलांच्या मेकअपशी संबंधित कित्येक सौंदर्य प्रसाधने बाजारात उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत मेकअपशी अपरिचित असलेल्या महिला पहिल्यांदा मेकअप करताना अनेकदा घाबरतात. चला तर मग आम्ही तुम्हाला काही सोप्या मेकअप टिप्सबद्दल सांगत आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही अगदी सुरुवातीपासूनच मेकअप एक्सपर्ट बनू शकता.
मेकअप करण्यापूर्वी, क्लिन्जरच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. तुम्ही कापसावर टोनर लावू शकता आणि चेहरा पूर्णपणे पुसून काढू शकता. यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ होईल. आता टोनरने चेहरा स्वच्छ केल्याल्यानंतर चेहऱ्यावर हलकेसे मॉइश्चरायझर लावा. जेणेकरून चेहरा कोरडा राहणार नाही. आणि मेकअप करण्यास सोपे जाईल.
मेकअप बेस तयार करण्यासाठी, सर्वप्रथम बोटांच्या मदतीने हलकासा फाउंडेशन चेहऱ्यावर लावा. आता हे फाउंडेशन हलक्या हाताने पसरवा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यानंतर डोळ्यांखाली कन्सीलर लावा. आता मेकअप ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर सर्कुलर मोशनमध्ये कॉम्पॅक्ट पावडर लावा. याने तुमचा मेकअप बेस पूर्णपणे तयार होईल.
डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी आधी तुमच्या आवडीची आय शॅडो निवडा. आता ब्रशच्या मदतीने आय शॅडो गोलाकार पापण्यांवर लावा. यानंतर डोळ्यांना आयलायनर लावा. तुम्ही लॅश कर्लर वापरून तुमच्या पापण्यांना कर्ल देखील करू शकता. शेवटी पापण्यांना मस्करा लावा. ज्याने तुमच्या डोळ्यांचा मेकअप पूर्ण होईल.
डोळ्यांचा मेकअप केल्यानंतर, गाल आणि ओठांना ब्लशर आणि लिपस्टिक लावायचे विसरू नका. अशा स्थितीत गालावर ब्लशर लावा आणि ते चांगले पसरवा. आता ओठांवर लिपस्टिक किंवा लिपग्लॉस लावा. बोटांच्या मदतीने ओठांचा रंग पसरवा. तसेच, तुम्ही दोन्ही ओठ एकत्र दाबून ओठांचा रंग पसरवू शकता.
चेहऱ्याची जॉ रेषा, नाक आणि कपाळ हायलाइट करण्यासाठी तुम्ही हायलाइटर वापरू शकता. यासाठी हायलाइटरला वरपासून खालपर्यंत ड्रॅग करून लावा. पण लक्षात ठेवा की हायलाइटरचा जास्त वापर टाळा. अन्यथा, यामुळे तुमचा मेकअप लुक खराब होऊ शकतो.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
संबंधित बातम्या