Home remedies for dark underarms: महिला आपल्या सौंदर्यावर विशेष लक्ष देत असतात. त्यामुळेच शरीराच्या प्रत्येक भागाची काळजीने सफाई करत असतात. जेणेकरून स्वच्छताही राहील आणि सौंदर्यही वाढेल. परंतु बऱ्याचवेळा काळजी घेऊनसुद्धा शरीराचे काही भाग काळे पडतात. त्यातीलच एक म्हणजे अंडरआर्म्स होय. अनेकांना क्युट असे स्लीव्हलेस कपडे परिधान करणे प्रचंड आवडते. परंतु काळ्या अंडरआर्म्समुळे तुम्ही ते घालू शकत नाही. जर तुम्हालाही अंडरआर्म्स काळे झाल्यामुळे स्लीव्हलेस कपडे घालण्यास संकोच वाटत असेल तर तुम्ही आम्ही सांगितलेले हे घरगुती उपाय करून पाहू शकता. या उपायांनी तुमच्या त्वचेला कोणतीही इजा न होता फायदाच मिळणार आहे. या उपायांनीं तुम्हाला बिनधास्तपणे स्लीव्हलेस घालण्याचा आत्मविश्वास येईल. चला तर मग पाहूया हे उपाय कोणते आहेत.
सर्वप्रथम अंडरमार्म्स काळे होण्यामागील कारणे तुम्ही जाणून घेतली पाहिजेत. जेणेकरून तुम्हाला त्यावर योय उपाय करता येतील. जर तुमचे अंडरआर्म्ससुद्धा काळे झाले असतील, तर त्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की शेव्हिंगमुळे खाज सुटणे आणि आगआग होणे, मृत पेशी नीट साफ न होणे किंवा घट्ट व फिट कपडे घालणे यामुळे देखील हे होऊ शकते. त्यामुळे शक्यतो रेजर वापरू नका आणि सैल कपडे घालण्याला पसंती द्या.
अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा अत्यंत उपयोगी ठरतो. बेकिंग सोड्यापासून स्क्रब तयार करण्यासाठी, तुम्हाला एका लहान भांड्यात १ चमचा बेकिंग सोडा आणि १ चमचा पाणी आवश्यक आहे. आता या दोन गोष्टी मिक्स करा आणि अंडरआर्म्सच्या काळ्या झालेल्या भागावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. २० ते २५ मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. आपण आठवड्यातून हे २ ते ३ वेळा वापरू शकता.
नारळाच्या तेलाचे किती फायदे आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी सुद्धा नारळाचे तेल उपयुक्त आहे. त्यासाठी नारळाच्या तेलात बेकिंग सोडा मिसळल्यानंतर, जेव्हा आपण ही पेस्ट वापरतो,तेव्हा अंडरआर्म्समधील मृत पेशी निघून जातात. त्यामुळे काळेपणासुद्धा दूर होतो.
यासाठी तुम्हाला १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा मैदा आणि १ चमचा दही लागेल. आता हे सर्व पदार्थ एका भांड्यात नीट मिक्स करा आणि अंडरआर्म्सवर २० मिनिटे लावा. ते कोरडे होऊ द्या. वाळल्यानंतर, कोमट पाण्याने स्वच्छ करा. यामुळे तुमच्या अंडरआर्म्सचा काळेपणा तर दूर होईलच पण स्किन ग्लोइंग होईल.