Dark Circle Remedies: अवघ्या १० रुपयांत गायब होतील डार्क सर्कल; ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करून पाहा!-dark circle home remedies dark circles will disappear in just 10 rupees do try this home remedy ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dark Circle Remedies: अवघ्या १० रुपयांत गायब होतील डार्क सर्कल; ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करून पाहा!

Dark Circle Remedies: अवघ्या १० रुपयांत गायब होतील डार्क सर्कल; ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करून पाहा!

May 09, 2024 04:15 PM IST

Dark Circle Home Remedies: डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळे घरगुती उपायांनीही सहज काढता येतात. डोळ्यांखालचे डार्क सर्कल तुमच्या चेहऱ्याचा संपूर्ण लूक खराब करू शकतात.

अवघ्या १० रुपयांत गायब होतील डार्क सर्कल
अवघ्या १० रुपयांत गायब होतील डार्क सर्कल (Freepik)

Dark Circle Home Remedies: आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या काही गोष्टी खाण्यासोबतच सौंदर्याची काळजी घेण्यासाठीही प्रभावी मानल्या जातात. त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक सौंदर्य उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु, त्यांचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. खरं तर, त्यात रसायने असल्याने अशी उत्पादने त्वचेला हानी पोहोचवतात. बहुतांश स्त्रिया त्वचेच्या प्रकाराकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांच्या त्वचेवर कोणतेही उत्पादन वापरतात. तथापि, त्वचेची काळजी घेण्याच्या घरगुती उपचारांच्या बाबतीत असे होत नाही. घरगुती उपचार कोणत्याही हानीशिवाय अनेक फायदे देतात...

डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळे घरगुती उपायांनीही सहज काढता येतात. डोळ्यांखालचे डार्क सर्कल तुमच्या चेहऱ्याचा संपूर्ण लूक खराब करू शकतात. हे डार्क सर्कल्स घालवले सोपे नाही. जर, यावर तुम्हाला घरच्या घरी उपचार करायचा असेल, तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत...

Headache In Summer: उन्हाळ्यात डोकेदुखी वाढलीये? ‘ही’ असू शकतात कारणे! ‘या’ उपायांमुळे मिळेल आराम

का येतात डोळ्यांखाली डार्क सर्कल्स?

डार्क सर्कल्सपासून मुक्त होण्यापूर्वी, ते का होतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. डोळ्यांभोवतीची त्वचा काळी पडणे यालाच डार्क सर्कल्स म्हणतात. वाढत्या वयामुळे, शरीरात पाण्याची कमतरता आणि इतर कारणांमुळे डोळ्याभोवती डार्क सर्कल्स तयार होतात. मात्र, झोपेची कमतरता आणि तणाव हे डार्क सर्कल्सचे प्रमुख कारण मानले जाते.

कशी दूर कराल डार्क सर्कल्सची समस्या?

बटाट्याचा रस : स्वयंपाकघरातील बटाट्यामुळे टॅनिंग, पिगमेंटेशन आणि डार्क सर्कल्स अशा समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात. अगदी स्वस्तात मिळणाऱ्या बटाट्याच्या रसात स्टार्च असतो. जर तुम्ही ते नियमितपणे त्वचेवर बटाट्याचा रस लावला तर त्वचेवर सकारात्मक बदल दिसू लागतात. यासाठी एका भांड्यात बटाट्याचा रस घ्या आहे आणि कापसाच्या मदतीने डोळ्याभोवती लावा. चुकूनही तो डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्या.

Jewellery Market: सर्वात स्वस्त आणि मस्त ज्वेलरी खरेदी करायची? मग मुंबईतील ‘या’ बाजारांमध्ये नक्की जा

काकडीचा रस : डोळ्यांच्या त्वचेखाली ओलावा नसल्यामुळे काळी वर्तुळे देखील तयार होतात. तुम्ही काकडीच्या रसाने डार्क सर्कल्स दूर करू शकता. एका भांड्यात काकडीचा रस काढून तो त्वचेवर लावा. तसे, डोळ्यांवर काकडीचे तुकडे ठेवल्याने देखील फरक दिसून येतो. त्वचा, केस आणि आरोग्यासाठी काकडी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात काकडीचे सेवन जास्त करावे.

कोरफड जेल : कोरफडीचा गर अर्थात ऍलोवेरा जेल सौंदर्य काळजी घेण्यमध्ये सर्वोत्तम आहे. त्याचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचा दुरुस्ती करण्यास मदत करतात. यामुळे मृत पेशी दूर होतात आणि चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो. डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर डोळ्याभोवती चोळा.

ग्रीन टी बॅग : डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी तुम्ही ग्रीन टीची मदत देखील घेऊ शकता. यात हायड्रेटिंग गुणधर्म असतात आणि ते त्वचेच्या दुरुस्तीसाठी देखील मदत करतात. यासाठी तुमच्या डोळ्यांवर ग्रीन टीच्या आपलेल्या बॅग ठेवू शकता.

Whats_app_banner
विभाग