Dairy Farming: गाई-म्हशींचे दूध वाढवायचे आहे? करा 'हे' सोपे उपाय, लगेच दिसेल फरक
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dairy Farming: गाई-म्हशींचे दूध वाढवायचे आहे? करा 'हे' सोपे उपाय, लगेच दिसेल फरक

Dairy Farming: गाई-म्हशींचे दूध वाढवायचे आहे? करा 'हे' सोपे उपाय, लगेच दिसेल फरक

Published Aug 24, 2024 11:13 AM IST

Want to increase the milk of cows: सध्या भारतीय दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना जगभरात मागणी आहे. पूर्वी हा व्यवसाय फक्त दूध, दही, लोणी इतकाच मर्यादित होता. पण आता चीज, मेयोनीज, पनीर, टोफूची मागणीही वाढत आहे.

गाई-म्हशींचे दूध कसे वाढवायचे
गाई-म्हशींचे दूध कसे वाढवायचे (pexel)

How to increase the milk of cows and buffaloes: भारतामध्ये ग्रामीण भागात जवळपास सर्वच घरांमध्ये गाई-म्हशी पाळल्या जातात. त्यांचे दूध आणि दुधाचे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. परंतु अलीकडे हे घरापुरते मर्यादित नाही. सध्या भारतीय दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना जगभरात मागणी आहे. पूर्वी हा व्यवसाय फक्त दूध, दही, लोणी इतकाच मर्यादित होता. पण आता चीज, मेयोनीज, पनीर, टोफूची मागणीही वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दुधाचा वापर केला जातो. काही दुग्ध व्यवसाय करणारे लोक जनावरांची संख्या वाढवून तर काही गुरांना इंजेक्शन देऊन दुधाची मागणी पूर्ण करतात. हे पूर्णपणे असुरक्षित आहे, ज्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

तज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात इंजेक्शन वापरल्यास गाईचे किंवा म्हशीचे दूध गळू लागते. ज्यामुळे जनावरांना कमजोरी येते. आज आपण अशा पद्धतींबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे दुधाचे नैसर्गिक उत्पादन तर वाढेलच पण गुरांचे आरोग्यही सुधारेल. आज अनेक गावातील शेतकरी आणि पशुपालक या देशी उपायांच्या मदतीने आपल्या गाई-म्हशींचे दूध वाढवून चांगली मिळकत करत आहेत.

आयुर्वेदिक चूर्ण-

आजच्या काळात आयुर्वेदाचे महत्त्व वाढत आहे. चांगल्या आरोग्यासाठी लोक औषधी वनस्पतींचे सेवन करतात. हीच गोष्ट आपल्या जनावरांनादेखील लागू होते. आज बाजारात अनेक कंपन्या नैसर्गिक औषधांपासून पावडर बनवत आहेत. ही भुकटी चारा किंवा पाण्यात मिसळून दिल्यास जनावरांचे दूध उत्पादन वाढते. गावातील बहुतांश शेतकरी आणि पशुपालकांना या पावडरची रेसिपी माहीत आहे. 

हे आयुर्वेदिक चूर्ण बनवण्यासाठी २५० ग्रॅम गव्हाची लापशी, १०० ग्रॅम गुळाचा रस, ५० ग्रॅम मेथी, एक ओले खोबरे , २५ ग्रॅम जिरे आणि २५ ग्रॅम ओवा या पदार्थांची गरज पडेल. जनावरांचे दूध उत्पादन वाढवणारी ही औषधी पावडर बनवण्यासाठी लापशी, मेथी आणि गूळ पूर्णपणे शिजवून घ्या. नारळ बारीक करून त्यात घाला आणि पावडर बनवून ठेवा. आता ही औषधी पावडर २ महिने दररोज सकाळी रिकाम्या पोटी जनावरांना खायला द्या.

मोहरीचे तेल आणि पिठापासून बनणारे औषध-

दूध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांसाठी सर्वोत्तम घरगुती उपाय म्हणजे मोहरीचे तेल आणि पीठ होय. जे सहजपणे दूध उत्पादनाची क्षमता वाढवू शकतात. सर्व प्रथम,२०० ते ३०० ग्रॅम मोहरीचे तेल घ्या. आणि २५० ग्रॅम गव्हाचे पीठ घेऊन ते चांगले मिसळा.यानंतर या मिश्रणाचे गोळे बनवून ठेवा. म्हणजे जनावरांना खायला सोपे जाईल. आता हे औषध जनावरांना चारा-पाणी दिल्यानंतर संध्याकाळी खाऊ घालावे. परंतु हे औषध खाल्ल्यानंतर जनावरांना पाणी देऊ नये हे लक्षात ठेवा. हे देशी औषध फक्त ७ ते ८ दिवस दिले जाते. त्यानंतर पुन्हा लगेच हे औषध जनावरांना खाऊ घालू नका.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

 

 

Whats_app_banner