Cut Down Sugar For 2 Week :साखर हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आजकाल लोक हेल्दी खाण्यापेक्षा चविष्ट अन्नाला प्राधान्य देऊ लागले आहेत. जिभेला भुरळ घालणाऱ्या गोष्टी खायला सगळ्यांनाच आवडतात. यामुळेच अनेक लोक रोज मिठाई खातात, जी आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक आहे. मर्यादित प्रमाणात साखरेमुळे आरोग्याला गंभीर हानी होत नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिवसातून एक ते दीड चमचा साखर आरोग्यासाठी हानिकारक नाही. तथापि, यापेक्षा जास्त प्रमाणात साखर खाणे तुमच्या शरीरासाठी अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकते.
बरेच आरोग्य तज्ज्ञ मर्यादित प्रमाणात साखर खाण्याची किंवा साखर पूर्णपणे सोडून देण्याची शिफारस करतात. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आणि सांगितले की, जर तुम्ही फक्त दोन आठवडे म्हणजे१४ दिवस साखर खायची सोडली, तर त्यामुळे तुमच्या शरीरात अनेक आश्चर्यकारक बदल दिसून येऊ शकतात. हे बदल काय आहेत ते जाणून घेऊया...
जर, तुम्ही१४ दिवस साखर बंद केली, तर त्याचा तुमच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येईल. कारण, दोन आठवडे साखर न खाल्ल्यास तुमचा चेहरा पूर्वीच्या गोल आकारापेक्षा अधिक नैसर्गिक आकारात दिसू शकतो.
याशिवाय, जर तुम्ही साखर सोडली तर ते तुमच्या डोळ्यांभोवती येणारा फुगीरपणा आणि द्रव टिकवून ठेवण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे तुमचे डोळे कमी सुजलेले दिसतील.
जर, तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी कमी करायची असेल तर फक्त दोन आठवडे साखर खाणे बंद करा. कारण, असे केल्याने तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यास खूप मदत होईल. कारण साखर सोडल्याने तुमच्या यकृतामध्ये साठलेली चरबी कमी होईल, ज्यामुळे पोटाची चरबीही कमी होईल.
डॉक्टरांनी असेही सांगितले की, जर तुम्ही फक्त१४ दिवस साखर खाणे सोडले, तर तुमच्या आतड्याचे आरोग्य देखील सुधारू शकते. याचे कारण असे की, साखर सोडल्याने तुमच्या आतड्यात निरोगी बॅक्टेरिया पुनर्संचयित होतात, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते.
जर, तुम्हाला मुरुमे किंवा लाल डागांची समस्या असेल, तर आजच साखरेला बाय-बाय करा. दोन आठवडे साखर न खाल्ल्याने तुम्ही मुरुम किंवा लाल डागांच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता आणि तुमची त्वचा पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ दिसते.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
संबंधित बातम्या