Diabetes Control : मधुमेहाच्या रुग्णांनी आवर्जून खावीत ‘ही’ हिरवी पानं; अजिबात वाढणार नाही तुमची शुगर!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diabetes Control : मधुमेहाच्या रुग्णांनी आवर्जून खावीत ‘ही’ हिरवी पानं; अजिबात वाढणार नाही तुमची शुगर!

Diabetes Control : मधुमेहाच्या रुग्णांनी आवर्जून खावीत ‘ही’ हिरवी पानं; अजिबात वाढणार नाही तुमची शुगर!

Nov 04, 2024 08:47 PM IST

Curry Leaves For Diabetes Control : मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही पानं खूप फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये आढळणारा हायपोग्लायसेमिक घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतो.

Diabetic patients must eat green curry leaves
Diabetic patients must eat green curry leaves

Curry Leaves For Diabetes Control : दिसायला साधे पान असूनही कढीपत्ता अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. याच्या नियमित सेवनाने आरोग्याला फायदा तर होतोच शिवाय अनेक आजारांपासूनही संरक्षण मिळते. आयुर्वेदात झाडे, वनस्पती आणि औषधी वनस्पतींचा वापर अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. कढीपत्ता फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही, तर त्यात औषधी गुणधर्मही आहेत. कढीपत्त्याचा वापर डाळीपासून चटणी बनवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी केला जातो. चला जाणून घेऊया कढीपत्त्याचे औषधी गुणधर्म आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...

कढीपत्त्याची पोषकतत्त्वे

कढीपत्त्यात भरपूर पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट असतात. त्यात तांबे, कॅल्शियम, फॉस्फरस, फायबर, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम आणि लोह सारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यासोबतच यामध्ये जीवनसत्त्वे आणि अमीनो ॲसिड देखील असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. ही सर्व पोषक तत्वे माणसाला निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि अनेक रोगांपासून बचाव करू शकतात.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त

मधुमेहाच्या रुग्णांसाठी कढीपत्ता खूप फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये आढळणारा हायपोग्लायसेमिक घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतो. याचे नियमित सेवन केल्याने मधुमेहाचा धोका तर कमी होतोच, पण ज्यांना ही समस्या आधीपासून आहे, त्यांच्यासाठीही ते फायदेशीर ठरू शकते.

Weight Loss Salad : वाढतं वजन कंट्रोल करायचंय? मग नक्की ट्राय करा व्हायरल काकडीचं सॅलड! सोपी आहे रेसिपी

पचन सुधारते

कढीपत्त्यात अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. कडीपत्ता पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते आणि अपचन, गॅस आणि पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोटही निरोगी राहते.

ॲनिमिया दूर करण्यासाठी उपयुक्त

कढीपत्त्यात फॉलिक ॲसिड आणि लोह असते, जे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी आणि ॲनिमिया दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्याचे नियमित सेवन शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते.

केसांसाठी फायदेशीर

कढीपत्त्यात केसांसाठी फायदेशीर घटक असतात, ज्यामुळे केस गळती थांबवता येता येऊ शकते. कडीपत्त्याच्या सेवनाने पांढरे केस काळे होतात आणि केसांची वाढही सुधारते. केसांसाठी त्याची पेस्ट बनवून केसांना लावणे देखील फायदेशीर आहे. याशिवाय कढीपत्त्याचे सेवनाने तोंडाचे व्रण बरे होतात आणि ही पानं वजन कमी करण्यात देखील फायदेशीर ठरू शकतात.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner