आपलं घर सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. विशेषतः श्रावण महिना सुरु झाला की अनेक सण सुरु होतात. या सणाला आपले घर सुंदर सजवलेले असेल की एकदम प्रसन्न वाटते. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याने आपल्या घराचे कौतुक करावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आता त्याची सुरुवात कशी करायची हे सर्वात मोठे आव्हान आहे. आज आम्ही तुमच्यासोबत पाच क्रिएटिव्ह हॅक्स शेअर करणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वत:ला एकदम नवा लूक देऊ शकता, तेही कमी बजेटमध्ये. चला तर मग जाणून घेऊया.
आपलं घर पूर्वीपेक्षा थोडं वेगळं आणि सुंदर दिसायचं असेल तर घरातील पडदे आणि फर्निचरमध्ये बदल करण्याची गरज आहे. थोडे वेगळे आणि स्टायलिश पडदे लावून घराचा लूक पूर्णपणे बदलता येतो. आपल्या पडद्यांचे प्रिंट आणि पॅटर्न बदला. त्याचबरोबर फर्निचरला नवा लूक देण्यासाठी तुम्ही सुंदर कव्हर आणि वेगवेगळ्या रंगांचा वापर करू शकता. या दोन्ही पद्धतीतुमच्या घराला वेगळा आणि स्टायलिश लुक देतील.
घरातील क्रिएटीव्ह डेकोरेशन हे अगदी कमी पैशात तुमचे लग्झरी घरात राहण्याच स्वप्न पूर्ण करते. घरात प्लास्टिकचे जुने डबे आणि बाटल्या पडून असतील तर त्यांच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या वस्तू बनवू शकता. जुन्या मॅगझिनच्या कव्हरच्या साहाय्याने तुम्ही घरातील एखादी भींत सजवू शकता. जुन्या वर्तमानपत्रांच्या गठ्ठ्यांपासून अनेक सर्जनशील गोष्टी बनवता येतात. तुम्ही घर सजवण्यासाठी त्यांचा वापर करु शकता.
प्रत्येक घरात बेडरूम सर्वात महत्वाची असते. जर तुम्हाला तुमच्या बेडरूमला एक अनोखा लूक द्यायचा असेल तर बेड आणि त्याच्या सभोवतालचा परिसर सजवायला विसरू नका. पलंगाच्या बाजूला भिंत सजवण्यात वेळ घालवा. कुटुंबाची काही छायाचित्रे किंवा बाजारातून विकत घेतलेल्या फ्रेम्स तुम्ही सजवू शकता. यासोबतच तुम्ही तुमच्या बेडभोवती एक आवनिंग तयार करू शकता. होय, अगदी राजकन्यांच्या कथेत जसं दिसतं. यासाठी तुम्ही पांढरे पडदे आणि लाकडी फ्रेम्स वापरू शकता.
घराची फरशी असेल तर त्यात थोडा रंग भरण्यासाठी गरज आहे. बाजारात येणारे सुंदर कार्पेट विकत आणा. हल्ली बाजारात रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या डिझाइनचे कार्पेट विकत मिळतात. सणासुदीला हे कार्पेट तुम्ही वापरु शकता. त्याचबरोबर वेगवेगळ्या पॅटर्नआणि ब्राइट शेड्सचे कार्पेट तुमच्या घराला पूर्णपणे वेगळा आणि स्टायलिश लूक देतील.
वाचा: तुमचा मुलगा रोज शाळेतील टिफिन परत आणतोय? भारती सिंहच्या मुलाचे डायट करा फॉलो
आता घराला नेहमी रंगरंगोटी करणे शक्य नसते आणि जोपर्यंत भिंतींशी छेडछाड होत नाही, तोपर्यंत घराला थोडा वेगळा लूक मिळणे अवघड असते हेही खरे. काळजी करण्याचे कारण नाही कारण हल्ली बाजारात सुंदर आणि परवडणारे वॉलपेपर उपलब्ध आहेत. एकापेक्षा जास्त प्रिंट असलेले हे वॉलपेपर सहजपणे भिंतींना चिकटतात आणि एकदम नवीन पेंटसारखे फिनिश देतात. आपल्या आवडत्या रंगाचे आणि पॅटर्नचे वॉलपेपर लावून तुम्ही तुमच्या घराला नवा आणि व्हायब्रंट लूक देऊ शकता.
संबंधित बातम्या