Corn Starch Side Effects: सूप घट्ट करायचं असो किंवा, व्हेजिटेबल ग्रेव्हीला थोडा जाड पोत द्यायचा असो, लोक अनेकदा स्वयंपाकघरात कॉर्न स्टार्च सर्रास वापरतात. या पांढऱ्या पावडरचा वापर अन्नाचे सौंदर्य वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. परंतु, आरोग्यासाठी हे अत्यंत हानिकारक उत्पादन आहे. जर आपण सतत जेवणात कॉर्न स्टार्च वापरत असाल, तर यामुळे रक्तातील साखर वाढू लागते आणि हृदयरोगाचा धोका निर्माण होतो. कॉर्न स्टार्चमुळे होणारे नुकसान जाणून घ्या…
कॉर्न स्टार्च तयार करण्यासाठी सामान्यत: मक्याचा वापर केला जातो. पण, त्यावर खूप प्रक्रिया केली जाते. ज्यामुळे त्यात कॅलरीज आणि कार्चेब प्रमाण खूप जास्त असते. एक कप कॉर्न स्टार्चमध्ये सुमारे ४९० कॅलरी आणि १२० ग्रॅम कार्ब असतात. तसेच, जीवनसत्त्वे आणि प्रथिनांची पातळी खूप कमी असते. त्यामुळे कॉर्न स्टार्च आरोग्यासाठी चांगला नसतो.
कॉर्न स्टार्चमध्ये कार्बचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे त्याचा ग्लाइसेमिक इंडेक्सही जास्त असतो आणि याच्या सेवनामुळे रक्तातील साखर वाढते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे हानिकारक उत्पादन आहे. सतत कॉर्न स्टार्च खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखर वाढण्याचा धोका वाढतो आणि टाइप २ मधुमेह होऊ शकतो.
कॉर्न स्टार्च कॉर्न फ्लोरपासून बनवला जातो. परंतु, प्रक्रिया केल्यामुळे त्याचे सर्व पोषण नष्ट होते. अभ्यासानुसार, यातील रिफाईंड कार्ब हृदयासाठी हानिकारक असतात. हृदयरोग, स्ट्रोक, हृदय बंद पडण्याची भीती असते. याचे कारण म्हणजे रिफाईंड अन्नामुळे ट्रायग्लिसेराइड वाढते. जर तुम्ही सतत खाद्यपदार्थांमध्ये कॉर्न स्टार्च घालत असाल, तर वजन वाढण्याचा ही धोका असतो. निरोगी राहण्यासाठी सूप पीत असाल, पण त्यात कॉर्न स्टार्च घालत असाल, तर ते तुमचे आरोग्य बिघडवणारे ठरणार आहे. यात असलेले कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज वजन झपाट्याने वाढवतात.
अन्नपदार्थांमधील कॉर्न स्टार्चची काळजी न घेतल्यास आणि दररोज त्याचे सेवन केल्यास शरीरातील ट्रायग्लिसेराइड वाढते. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो आणि उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते.
जेवणात फक्त एक ते दोन चमचे कॉर्न स्टार्च घातला, तरी तो सतत रोजच्या आहारात खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते. त्यामुळे तो खाताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या