Side effects of copper bottle: गेल्या काही वर्षांत तांब्याच्या भांड्यांचा वापर झपाट्याने वाढला आहे. विशेषतः तांब्याच्या बाटल्या बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. निरोगी राहण्यासाठी लोकांना या बाटल्यांमधील पाणी प्यायला आवडते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पचनक्रिया सुधारण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढते. पण तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे जसे फायदे आहेत. तसेच त्याचे काही नुकसानही आहेत. त्यामुळे आरोग्याला अनेक हानी होतात. जाणून घ्या शरीरात तांब्याचे प्रमाण वाढले तर शरीराला कसे नुकसान होऊ शकते.
तांब्याच्या बाटल्या, ग्लास आणि जगातून पाणी सतत प्यायल्याने तांब्याच्या टॉक्सिटीची अर्थातच विषारीपणाची समस्या वाढण्याचा धोका आहे. तांबा हा एक जड धातू आहे. आणि जेव्हा शरीरात त्याचे प्रमाण जास्त वाढते, तेव्हा ते शरीराला हानी पोहोचवू लागते. शिवाय आजारांना कारणीभूत ठरते.कॉपर पॉइझनिंगमुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे सतत मळमळ, उलट्या, जुलाब इत्यादी.नियमितच्या वापराने तुमच्या शरीरात कॉपर टॉक्सिटी जास्त प्रमाणात वाढली तर यकृत खराब होण्याचा धोका असतो.त्याचबरोबर किडनीची समस्या, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर यांसारख्या गंभीर समस्याही उद्भवू शकतात.
बहुतांश लोक तांब्यापासून बनलेल्या विविध भांड्यांचा वापर करत असतात. अनेक लोक दैनंदिन जीवनात तांब्याच्या बाटलीमधूनच पाणी पित असतात. तांब्याच्या बाटलीतून चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यावर, किंवा तांब्याची बाटली नीट साफ न केल्यास तांब्याच्या टॉक्सिटीची अर्थातच विषारीपणाची समस्या होण्याचा धोका जास्त असतो.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा स्वच्छता हा सर्वोत्तम मार्ग आहे. जर तुम्ही तांब्याची बाटली वापरत असाल तर ते आत खोलवर स्वच्छ करणे आवश्यक आहे. तांब्याची बाटली नीट साफ न केल्यास ती ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेत खूप लवकर जाते आणि त्यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया तयार होतात. त्यामुळे तांब्याच्या बाटलीऐवजी मोठे भांडे वापरा. जे तुम्ही सहज साफ करू शकता.
शिवाय तांब्याच्या भांड्यात गरम पाणी कधीही ठेवू नये. हे पाणी तांब्याच्या बाटलीत जाऊन अत्यंत हानिकारक बनते. हे पाणी नियमित पिणे म्हणजे आरोग्याशी तडजोड केल्यासारखे आहे.लिंबूपाणी सारख्या आम्लयुक्त गोष्टी तांब्याच्या बाटलीत किंवा भांड्यात ठेवू नये आणि सेवन करू नये. कारण तांबे आम्लयुक्त गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया देते.
तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे काही खास नियम आयुर्वेदात सांगण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी ८-१० तास जुने नसावे. म्हणजे पाणी रात्रभर ठेऊन ते सकाळी पिणे हे अत्यंत चुकीचे आहे. जास्त वेळ पाणी ठेवल्याने तांब्याची टॉक्सिटी वाढते.जर तुम्हाला तांब्याच्या भांड्याचे फायदे मिळवायचे असतील, तर दिवसातून एकदा किंवा दोनदाच त्यातून पाणी प्या. सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने तांबे पुरेशा प्रमाणात मिळते. यानंतर तुम्ही दिवसभर सामान्य पाणी पिऊ शकता. तांब्याचे भांडे दररोज स्वच्छ करणे महत्वाचे आहे जेणेकरून ते ऑक्सिडाइझ होणार नाही आणि बॅक्टेरियाही वाढणार नाहीत. अन्यथा पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब यासारख्या समस्या उद्भवू लागतात.