Cooking Tricks: लोणच्याचे उरलेले तेल फेकू नका, अशा प्रकारे वापरल्याने वाढेल जेवणाची चव-cooking tricks know how to reuse pickle oil to make your food more tasty ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Tricks: लोणच्याचे उरलेले तेल फेकू नका, अशा प्रकारे वापरल्याने वाढेल जेवणाची चव

Cooking Tricks: लोणच्याचे उरलेले तेल फेकू नका, अशा प्रकारे वापरल्याने वाढेल जेवणाची चव

Feb 24, 2024 02:31 PM IST

Pickle Oil Use: तुम्ही लोणच्याच्या मसाल्याचा वापर अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला असेल. तसेच लोणच्याचे उरलेले तेल सुद्धा वापरता येते. कसे ते जाणून घ्या.

उरलेले लोणच्याचे तेल पुन्हा वापरण्यासाठी टिप्स
उरलेले लोणच्याचे तेल पुन्हा वापरण्यासाठी टिप्स (freepik)

Tips To Reuse Pickle Oil: अनेक वेळा घरी तयार केलेल्या लोणच्यामध्ये कैरीच्या फोडी संपतात, पण त्यातील मसाला आणि तेल उरते. अनेक जण हा मसाला निरुपयोगी समजून फेकून देतात. पण असे करू नका. हा लोणच्याचा मसाला आणि तेलचा तुम्ही पुन्हा वापर करू शकता, हे वाचल्यानंतर तुम्ही पुढच्या वेळी हा टेस्टी मसाला फेकणार नाही. लोणच्याचा मसाला तुम्ही अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरू शकता. लोणच्याच्या तेलाचा पुनर्वापर करून कोणत्या पदार्थाची चव कशी वाढवता येईल ते जाणून घेऊया.

दाल तडका

लोणच्याचे उरलेले तेल तुम्ही डाळ, भाज्या आणि चटणीमध्ये फोडणी घालण्यासाठी किंवा तडका देण्यासाठी वापरू शकता. त्यात लोणच्याचा सुगंध आणि मसाल्यांचा समावेश असल्याने याची फोडणी दिल्याने चव आणि सुगंध दोन्ही वाढते.

फ्राईड राईस

जर तुम्हाला उरलेल्या भातापासून चविष्ट पदार्थ बनवायचा असेल तर उरलेला लोणच्याचा मसाला तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. तुम्ही फ्राईड राईस बनवण्यासाठी उरलेल्या लोणच्याचे तेल वापरू शकता. लोणच्याचे तेल फ्राईड राईसची चव आणि सुगंध दोन्ही वाढवते.

स्टफ पराठा बनवण्यासाठी

तुम्ही पराठ्याच्या स्टफिंगमध्ये सुद्धा उरलेले लोणच्याचा मसाला वापरू शकता आणि त्याची चव वाढवू शकता. यासाठी पराठा बनवताना थोडा लोणच्याचा मसाला बटाटे किंवा इतर सारणात मिक्स करा.

पास्ता

तुमचा पास्ता चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही लोणच्याचे तेल वापरू शकता. लहान मुले असो वा मोठे पास्ता आवडीने खाल्ला जातो. पास्ता मध्ये चटपटीत टेस्ट आणण्यासाठी लोणच्याचे तेल वापरा. यासाठी सर्वात आधी पास्ता उकळून बाजूला ठेवावा. यानंतर पॅनमध्ये तेल, लसूण, कांदा आणि टोमॅटो घालून भाजून घ्या, नंतर पास्ता सॉस आणि लोणच्याचे तेल घाला आणि पास्ता घाला. सर्व नीट मिक्स करा आणि गरमागरम सर्व्ह करा.

मॅरीनेशनसाठी वापरा

उरलेले लोणच्याचे तेल निरुपयोगी नसून ते नॉनव्हेजपासून ते ग्रील्ड व्हेजिटेबल्सपर्यंत सर्व काही मॅरीनेट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यासाठी ग्रीलिंगच्या २ ते ३ तास आधी मीट, मासे आणि भाज्यांमध्ये थोडेसे लोणच्याचे तेल टाकून ते मिसळून ठेवावे. असे केल्याने ग्रील्ड डिशची चव डबल होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग