Cooking Tips: घरी आईस्क्रीम बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स, मिळेल बाजारासारखी टेस्टी चव
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Tips: घरी आईस्क्रीम बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स, मिळेल बाजारासारखी टेस्टी चव

Cooking Tips: घरी आईस्क्रीम बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स, मिळेल बाजारासारखी टेस्टी चव

May 01, 2024 11:12 PM IST

Cooking Tricks: उन्हाळ्याच्या आईस्क्रीम खायला सर्वांनाच आवडते. अशा परिस्थितीत तुम्ही घरच्या घरी मार्केट सारखी आईस्क्रीम बनवू शकता. यासाठी येथे काही उत्तम टिप्स पहा-

Cooking Tips: घरी आईस्क्रीम बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स, मिळेल बाजारासारखी टेस्टी चव
Cooking Tips: घरी आईस्क्रीम बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स, मिळेल बाजारासारखी टेस्टी चव (unsplash)

Tips to Make Ice Cream at Home: तसं तर बाजारात विविध प्रकारच्या आइस्क्रीम उपलब्ध आहेत. पण घरी बनवलेल्या आईस्क्रीमची चव वेगळी असते. आपण कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय घरगुती आईस्क्रीम तयार करू शकता. घरी अगदी सहज आईस्क्रीम बनवता येते. पण अनेकांना ही समस्या असते की त्यांची आईस्क्रीम नेहमीच खराब होते. याची अनेक कारणे असू शकतात. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर येथे काही टिप्स आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही मार्केटसारखी आईस्क्रीम घरी सहज बनवू शकता.

घरी आईस्क्रीम बनवण्यासाठी टिप्स

- घरी आईस्क्रीम बनवताना लोकांना बऱ्याचदा अशी समस्या भेडसावते की त्यात बर्फ गोठू लागतो. बर्फाचे लहान क्रिस्टल्स आईस्क्रीमची चव खराब करतात. हे टाळण्यासाठी आईस्क्रीम क्लिंग फिल्म किंवा बटर पेपरने झाकून फ्रिजमध्ये ठेवा.

- आइस्क्रीम गोठवण्यासाठी योग्य कंटेनर वापरा. जे सपाट आहेत आणि जास्त खोल नाहीत. योग्य कंटेनर निवडल्याने आइस्क्रीमची कंसिस्टंसी योग्य राहते.

- दर दोन-तीन तासांनी आइस्क्रीम थोडं ढवळत राहा. जेणेकरून बर्फाचे क्रिस्टल्स गोठणार नाहीत आणि ते थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.

आइस्क्रीममध्ये योग्य चव कशी मिळवायची

बऱ्याच वेळा घरी बनवलेल्या आईस्क्रीमची चव खराब होते आणि कधी-कधी आइस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवल्यावर त्याचा सुगंधही खराब होतो. अशा स्थितीत टेस्टी फ्लेवरफुल आईस्क्रीम बनवण्यासाठी जेव्हा दुधाचे बॅटर थंड होईल तेव्हा त्यात व्हॅनिला इसेन्स किंवा तुमच्या आवडीचे फ्लेवर घाला. यामुळे आइस्क्रीमची चव काही प्रमाणात वाढेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner