Cooking Trick: कुल्हडशिवाय चहाला मिळेल मातीचा सुगंध, फक्त बनवण्यासाठी फॉलो करा ही ट्रिक
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Trick: कुल्हडशिवाय चहाला मिळेल मातीचा सुगंध, फक्त बनवण्यासाठी फॉलो करा ही ट्रिक

Cooking Trick: कुल्हडशिवाय चहाला मिळेल मातीचा सुगंध, फक्त बनवण्यासाठी फॉलो करा ही ट्रिक

Published Feb 26, 2024 05:57 PM IST

Kulhad Flavour Tea: चहाप्रेमींना वेगवेगळ्या प्रकारच्या चहाची चव घ्यायला आवडते. मात्र कुल्हड चहाची चव अप्रतिम असते. ही ट्रिक फॉलो करून तुम्ही कुल्हड फ्लेवरचा चहा बनवू शकता.

कुल्हड फ्लेवर चहा बनवण्यासाठी ट्रिक
कुल्हड फ्लेवर चहा बनवण्यासाठी ट्रिक (unsplash)

Tricks to Make Earthy Aroma Tea: चहा प्रेमींना सकाळी आणि संध्याकाळी चहा पिण्याची सवय असते. अशा लोकांना चहा मिळाला नाही तर त्रास सुरू होतो. काही लोकांना डोकेदुखीचा त्रास होतो. चहा बनवणे खूप सोपे आहे. प्रत्येकजण आपल्या चवीनुसार आणि आवडीनुसार वेगवेगळा चहा बनवतो. रोजच्या चहाशिवाय कुल्हड चहाची चव सुद्धा लोकांना आवडते. पण कुल्हड घरी मिळत नाहीत. मात्र सध्या सोशल मीडियावर एक ट्रिक व्हायरल होत आहे, ज्याचा अवलंब करून तुम्ही कुल्हड फ्लेवरचा चहा बनवू शकता. जाणून घ्या हे कसे बनवायचे

हे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- दूध

- बडीशेप

- चहापत्ती

- साखर

- पाणी

- लवंगा

- वेलची

असा बनवा हा चहा

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ चहा बनवण्याची वेगळी पद्धत दाखवतो. हे बनवण्यसाठी एका पॅनमध्ये पाणी गरम करा आणि नंतर त्यात धुतलेले मातीचा दिवा ठेवा. नंतर बडीशेप घालून उकळवा. चांगली उकळी आल्यावर त्यात साखर घाला. आता चहामध्ये तुमच्या आवडीनुसार चहापत्ती घाला. नंतर वेलची आणि लवंगा बारीक करून त्यात घाला. आता त्यात दूध घालून उकळा. आता हा दिवा काढून घ्या आणि मग चहा गाळून घ्या.

लक्षात ठेवा

जेव्हा तुम्ही हा चहा बनवणार असाल तेव्हा मातीचे दिवा आधी नीट धुवून घ्या. बऱ्याचदा मातीच्या दिव्यामध्ये धूळ असू शकते, ज्यामुळे चहाची चव खराब होईल. त्यामुळे दिवा नीट धुवून वापरा.

 

Whats_app_banner