Cooking Oil: स्वयंपाकासाठी कोणते तेल चांगले? तेल निवडताना अजिबात करू नका 'ही' चूक-cooking tips which oil is best for cooking never make this mistake when choosing an oil ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Oil: स्वयंपाकासाठी कोणते तेल चांगले? तेल निवडताना अजिबात करू नका 'ही' चूक

Cooking Oil: स्वयंपाकासाठी कोणते तेल चांगले? तेल निवडताना अजिबात करू नका 'ही' चूक

Aug 29, 2024 01:00 PM IST

Which oil is beneficial for Cooking: फक्त पालेभाज्या खाणे पुरेसे नाही. कारण अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की, आपण जे तेल स्वयंपाकासाठी वापरतो त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो.

स्वयंपाकासाठी कोणते तेल चांगले
स्वयंपाकासाठी कोणते तेल चांगले (pexel)

Which oil is best for cooking:  शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहार आणि दैनंदिन दिनचर्या दोन्ही सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, जीवनसत्त्वे आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. परंतु फक्त पालेभाज्या खाणे पुरेसे नाही. कारण अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की, आपण जे तेल स्वयंपाकासाठी वापरतो त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो.

तुम्हीही स्वयंपाकासाठी निरोगी तेल शोधत असाल, तर सर्वप्रथम त्यामध्ये हेल्दी फॅटचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे. याशिवाय या तेलामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबाचा धोका तर वाढणार नाही ना? हेसुद्धा पाहणे गरजेचे आहे. तुम्ही वापरत असलेले तेल आरोग्याला फायदेशीर आहे का? स्वयंपाकासाठी योग्य तेल कसे निवडावे? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

स्वयंपाकासाठी तेल निवडण्याचे महत्व-

स्वयंपाकात योग्य तेलाचा वापर आपल्याला अनेक समस्यांपासून बचाव करण्यास मदत करतो. जेव्हा स्वयंपाकाचे तेल गरम केले जाते, तेव्हा काही क्षणात ते एका उच्च बिंदूपर्यंत पोहोचते. हे ते तापमान आहे ज्यावर तेलाचे ऑक्सिडेशन सुरू होते आणि फ्री रेडिकल्स त्यातून बाहेर पडतात. यामुळे सेल्युलरला नुकसान होऊ शकते आणि अनेक गंभीर आणि जुनाट आजार होण्याचा धोका असतो. याव्यतिरिक्त, जेव्हा ते धुराच्या बिंदूवर पोहोचतात तेव्हा ते एक्रोलिन नावाचा पदार्थ सोडतात. एक्रोलिन तुमच्या फुफ्फुसासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे योग्य तेल निवडणे महत्वाचे आहे.

स्वयंपाकासाठी सर्वोत्तम तेल कोणते-

अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की, ऑलिव्ह ऑइलचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ऑलिव्ह ऑइलमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते, जे अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते आणि अनेक प्रकारच्या जुनाट आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते. त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट देखील आढळते ज्याला ओलिक ऍसिड म्हणतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ऑलिक ऍसिडमध्ये कर्करोगविरोधी आणि अँटी इन्फ्लीमेन्टरी गुणधर्म आहेत. याशिवाय तज्ज्ञांच्या मते, एवोकॅडो तेलदेखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असलेली संयुगे पचनाशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि यकृत खराब होण्याचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे हे दोन तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम समजले जातात.

'हे' तेल वापरणे टाळा-

अभ्यासात काही प्रकारच्या तेलांचे आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. अत्यंत शुद्ध तेल तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे त्यांचे अँटिऑक्सिडंट आणि इतर फायदेशीर प्रभाव कमी होतात. या कारणास्तव रिफाइंड तेलांचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच ज्या तेलांमध्ये स्मोकिंग पॉईंट खूप कमी आहे ते फ्लेक्स सीड ऑइलदेखील टाळावे. त्यांना गरम केल्याने फ्री रेडिकल्स बाहेर पडण्याचा धोका अधिक असतो. याशिवाय वापरलेले तेल पुन्हा-पुन्हा वापरू नये. कारण तेच-तेच तेल गरम करून करून वापरल्याने हृदयासंबंधी समस्या उद्भवतात.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. याबाबतीत संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)