Homemade pasta made from flour: अलीकडच्या काळात लाईफस्टाईलमध्ये प्रचंड बदल झाला आहे. त्यामुळे आत्ताची मुले पारंपरिक जेवणाऐवजी बाहेरील खाद्यपदार्थांना पसंती देतात. घरामध्ये मुले अनेकदा चपाती खाण्यास नकार देतात. पास्ता, मॅकरोनी, नूडल्स यासारख्या गोष्टी मुलांना आवडतात. परंतु कितीही प्रयत्न केले तरी, त्यांना जंक फूड घरीच तयार करणे गरजेचे असते.
म्हणून आज आपण या स्मार्ट पद्धतीने गव्हाच्या पिठापासून पास्ता बनवायला शिकणार आहोत. हे खाल्ल्यानंतर, मुलंदेखील आनंदी होतील आणि तुम्हीदेखील आनंदी व्हाल. कारण तुम्ही चपातीचा हा निरोगी पर्याय मुलाला खायला द्याल. चला तर मग उरलेल्या पिठापासून स्वादिष्ट पास्ता कसा बनवायचा ते जाणून घेऊया.
-चपातीच्या पिठापासून पास्ता बनवणे खूप सोपे आहे. फक्त या खाली दिलेल्या गोष्टींचे अनुकरण करा.
-सर्वप्रथम, पीठ मळून तयार केलेल्या कणकेचा एक छोटा गोळा घ्या आणि तो पातळ आणि लांब लाटून घ्या.
-आता कोणतेही एखादे रिकामे पेन किंवा गोल छोटी काठी घ्या. ते धुवून स्वच्छ करा.
-या काठीवर तुम्ही लाटून तयार केलेला पातळ लांब कणकेचा गोळा गुंडाळा आणि शेवटचे टोक पाण्याच्या मदतीने चिकटवा.
-आता हळुहळु त्यातीलच काठी काढा आणि असेच सर्व रोल तयार करा.
-एका कढईत पाणी गरम करून त्यात थोडे मीठ व तेल घाला.
-पाणी गरम झाल्यानंतर हे सर्व रोल त्यात घालून शिजवून घ्या.
-कणकेचे हे रोल शिजल्यानंतर ते वर तरंगायला लागतात. तसेच, त्यात काठी घालण्याचा प्रयत्न करा. जर पीठ चिकटत नसेल तर याचा अर्थ असा की, ते चांगले शिजले आहेत.
-तुमचे सर्व रोल फक्त पाच ते सात मिनिटांत शिजतील.
-आता त्यांना पाण्यातून बाहेर काढा आणि थोडे थंड होऊ द्या.
-दुसऱ्या बाजूला एका कढईत तेल घालून गरम करा.
-तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे आणि लसूण घाला. तसेच कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या.
-टोमॅटो प्युरी, मसाले, मीठ घालून मिक्स करा.
-गाजर, वाटाणे, सिमला मिरची सारख्या तुम्हाला हव्या त्या भाज्या घालून शिजवा.
-आता फक्त तयार रोलचे छोटे तुकडे करून तयार फोडणीत मिसळा.
-शाप्रकारे चपातीच्या कणकेपासून बनवलेला चविष्ट पास्ता तयार आहे. जे तुम्ही मुलांना खायला देऊन खुश करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)