मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Tips: लिंबाची साल देखील वाढवू शकते जेवणाची चव, फक्त फॉलो करा या टिप्स

Cooking Tips: लिंबाची साल देखील वाढवू शकते जेवणाची चव, फक्त फॉलो करा या टिप्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 04, 2024 08:45 PM IST

Cooking Hacks: लिंबाची साल आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत करते. पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही लिंबाची साल जेवणाची चव वाढवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. पाहा या कुकिंग टिप्स.

Cooking Tips: लिंबाची साल देखील वाढवू शकते जेवणाची चव, फक्त फॉलो करा या टिप्स
Cooking Tips: लिंबाची साल देखील वाढवू शकते जेवणाची चव, फक्त फॉलो करा या टिप्स (unsplash)

Tips to Use Lemon Peels in Foods: बऱ्याचदा रस काढल्यानंतर लिंबाची साले फेकून दिली जातात. तुम्हीही आत्तापर्यंत असे करत असाल तर आता करू नका. व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याच्या नियमित सेवनाने वजन कमी होणे, पचनाच्या समस्या आणि प्रवासादरम्यान होणारा उलट्यांचा त्रास दूर होतो. पण तुम्हाला माहित आहे का की लिंबाप्रमाणेच त्याची साल देखील गुणांचा खजिना आहे. लिंबाच्या सालीमध्ये जीवनसत्त्वे, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फायबरसारखे अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. पण आज आपण लिंबाच्या सालीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी कसा करता येईल याबद्दल जाणून घेऊ. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही लिंबाच्या सालीने जेवणाची चव कशी वाढवू शकता ते पाहा.

ट्रेंडिंग न्यूज

लिंबाचे साल फेकण्याऐवजी अशा प्रकारे वापरा

चहा

तुमचा दिवस चांगला सुरू करण्यासाठी तुम्ही सकाळी लिंबूचा चहा पिऊ शकता. यासाठी लिंबाचा रस काढल्यानंतर साल फेकून देण्याऐवजी चहा बनवण्यासाठी वापर करा. लिंबाच्या सालीपासून चहा बनवण्यासाठी प्रथम लिंबाच्या साली पाण्यात उकळा. चवीनुसार साखरेऐवजी थोडे मध आणि चहापत्ती घालून उकळा. तुमचा लेमन टी तयार आहे.

लिंबाच्या सालीची पावडर

लिंबाच्या सालीची पावडर बनवण्यासाठी उन्हात वाळल्यावर बारीक करून पावडर तयार करा. आता तुम्ही या पावडरचा वापर करून तुमचे अनेक पदार्थ चविष्ट बनवू शकता.

लिंबाच्या सालीचे तेल

तुम्ही सॅलड ड्रेसिंगसाठी लिंबाच्या साली वापरू शकता. यासाठी एका भांड्यात लिंबाची साले टाका आणि त्यात तेल घाला. तुमचे लेमन ड्रेसिंग ऑइल तयार आहे. तुम्हाला हवे असल्यास हे तेल तुम्ही जेवणातही वापरू शकता.

लेमन शुगर

लिंबाच्या सालीपासून तुम्ही घरी लेमन शुगर सहज तयार करू शकता. यासाठी साखरेत लिंबाच्या सालीची पावडर मिक्स करा. आता हे मिश्रण एका बरणीत साठवा. या लेमन शुगरचा वापर तुम्ही जेवणाची चव वाढवण्यासाठी किंवा तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी देखील करू शकता.

लिंबाच्या सालीचे लोणचे

लिंबाचा रस काढल्यानंतर फेकून दिलेल्या लिंबाच्या सालीपासूनही चविष्ट लोणचे तयार करता येते. हे लोणचे खाण्यास इतके चविष्ट आहे की एकदा खाल्ल्यानंतर त्याची चव विसरता येणार नाही आणि तुम्ही लिंबाची साले कधीही फेकून देणार नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग