Tips to Reduce Excess Spice in Gravy or Curry: स्वयंपाक करणे ही एक कला आहे. हे करताना किरकोळ कमतरतांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. मात्र काही वेळा थोड्याशा निष्काळजीपणामुळे किंवा अन्न घटकांचे योग्य प्रमाण न समजल्यामुळे मसाल्यांचा अतिरेकी वापर केला जातो. अशा परिस्थितीत जेवणाची चव बिघडते. तुमच्या सोबतही असे कधी घडले असेल आणि ग्रेव्हीमध्ये खूप मसाले असतील तर या छोट्या स्मार्ट टिप्सने चव सुधारली जाऊ शकते. भाज्यांची ग्रेव्ही किंवा जेवणात जास्त झालेले मसाले कमी करण्यासाठी या टिप्स खूप उपयुक्त आहेत.
जास्त मसाला असेल तर सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे दुग्धजन्य पदार्थ असते. दूध, बटर, मलई किंवा क्रीम किंवा दही, चीज यापैकी चवीनुसार काहीही घालता येते. ग्रेव्हीमध्ये जास्त मसाला असेल तर बटरचा सर्वाधिक परिणाम होतो. लोणी मसाल्यांची तीक्ष्णता कमी करते. जर बटर योग्य नसेल तर दहीही चालते. दही घातल्याने रस्सामध्ये आंबटपणा येतो. तसेच मसाल्यांचा तिखटपणा कमी होतो.
जर ग्रेव्हीमध्ये खूप मसाले असतील तर काही घटक वाढवून ग्रेव्हीचा टेक्सचर बदला. उदाहरणार्थ खूप घट्ट ग्रेव्हीमध्ये खूप मसाले असल्यास पाण्याने त्याचा टेक्सचर दुरुस्त करा. ग्रेव्ही थोडी पातळ रस्स्यासारखी करता येते.
मंचूरियन किंवा सूपसारख्या काही प्रकारच्या ग्रेव्हीजचा तिखटपणा वाढला असेल किंवा खूप मसाले असतील तर त्यात मध, मॅपल सिरप, ब्राऊन शुगर घालून गोडवा वाढवा. त्यामुळे डिशची चव वाढते. आणि ग्रेव्हीचा तिखटपणा सुद्धा निघून जातो. तथापि, लक्षात ठेवा की गोडपणा जास्त नसावा अन्यथा संपूर्ण चव खराब होईल.
ग्रेव्ही किंवा करीमध्ये खूप मसाले असतील तर त्यात काजूची पेस्ट, बदामाची पेस्ट किंवा नारळाची पेस्ट बनवा. ही पेस्ट घालून ग्रेव्हीमधील मसाल्यांची चव संतुलित ठेवता येते. याने पदार्थाची चव फारशी बदलत नाही आणि मसाल्याची चव कमी होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या