Tips to Make Thick Gravy Without Tomatoes: टोमॅटोचा वापर सर्व भाज्या बनवण्यासाठी केला जातो. टोमॅटोशिवाय भाजी, डाळ बनवणे अनेक महिलांना अवघड वाटते. एखाद्या भाजीला ग्रेव्ही बनवायची म्हणजे टोमॅटो हवाच असतो. पण हल्ली टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे खिशाची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे. टोमॅटोशिवाय भाजी किंवा ग्रेव्हीमध्ये कंसिस्टंसी आणि आंबटपणा कसा आणता येईल, असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल. तर काळजी करू नका, तुम्ही टोमॅटोशिवाय देखील घट्ट ग्रेव्ही बनवू शकता. भाजीमध्ये आंबटपणा हवा असेल तसेच घट ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही या काही गोष्टी वापरू शकता. यामुळे टोमॅटोशिवाय ग्रेव्हीला घट्टपणा येईल आणि तुम्हाला सेम चव सुद्धा मिळेल. चला तर मग जाणून घ्या ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी वापरू शकता.
भाजीतील आंबटपणा वाढवण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता. यामुळे भाजीला चव आणि योग्य तिखटपणा मिळतो. भाजीमध्ये दही वापरल्यानंतर तुम्हाला टोमॅटोची कमतरता जाणवणार नाही. फक्त भाजीत दही घालताना हे लक्षात ठेवा की ते चांगले फेटून शेवटी घाला. जेणेकरून ते फुटण्याची शक्यता कमी होईल.
ग्रेव्हीमधील आंबटपणा वाढवण्यासाठी चिंचेचा वापर करू शकता. ते वापरल्यानंतर भाजीमध्ये टोमॅटोशिवाय त्याचा ताजा वास मिळेल. याचा वापर करण्यासाठी डाळ, कढी सारख्या गोष्टींमध्ये चिंचेचा पल्प किंवा थोडी पेस्ट मिक्स करा.
आंबटपणासाठी तुम्ही टोमॅटोऐवजी लिंबू वापरू शकता. याचा वापर करून टोमॅटोशिवाय सुद्धा भाजीची टँगी टेस्ट मिळेल. भाजी, डाळ शिजल्यानंतरच त्यात लिंबू घाला. लक्षात ठेवा भाजी, डाळ शिजवताना लिंबू घातले तर त्याची चव थोडी कडू लागू शकते.
ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी तुम्ही भोपळा देखील वापरू शकता. यासाठी भोपळा ब्लेंड करून नंतर कढईत चांगले भाजून घ्या. रंग बदलला की त्यात व्हिनेगर घाला. भाज्यांमध्ये याची प्युरी वापरता येते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या