Tips to Roast Makhana: चव आणि आरोग्याने परिपूर्ण असलेला मखाना स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो. ज्यांना वजन कमी करायचे आहे ते मखाना खाऊ शकतात. त्यात लोह, प्रथिने, कार्बोहायड्रेट, फॅट, खनिजे, फॉस्फरस, सोडियम, मॅग्नेशियम यांसारखे आवश्यक पोषक घटक आढळतात. हे सर्व पोषक घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. रोजच्या स्नॅकिंगच्या वेळेत तुम्ही मर्यादित प्रमाणात मखाना खाऊ शकता. मात्र मखाना भाजल्यानंतरच छान लागतो. जर ते भाजलेले नसतील तर ते खायला अजिबात चांगले लागत नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही काही ट्रिक्स फॉलो करून मखाना भाजू शकता. या ट्रिक्स कोणत्या आहेत ते जाणून घ्या.
- जर तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घेत असाल आणि तुप किंवा तेल न घालता मखाना भाजायचा असेल तर त्यासाठी ही ट्रिक बेस्ट आहे. यासाठी आधी एक कढई घ्या आणि गरम करण्यासाठी ठेवा. यासाठी शक्यतो जाड तळ असलेली कढई वापरावी. नंतर त्यात मखाना आणि थोडे मीठ घाला. आता मखानाला मध्यम आचेवर भाजून घ्या. काही वेळाने मखाना भाजला की त्यात मीठ घालू शकता.
- बाजारासारखा रोस्टेड मखाना खायचा असेल तर कढईत तूप गरम करून घ्या. तूप गरम झाल्यावर त्यात मखाना घाला. आता मखाना मध्यम आचेवर भाजून घ्या आणि नंतर त्यात थोडे मीठ, काळी मिरी पावडर आणि चाट मसाला घाला. नीट मिक्स करून नंतर प्लेटमध्ये काढा. मखाना पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)