Cake Baking Tips: घरी बनवलेला केक खराब होतो का? परफेक्ट बेकिंगसाठी फॉलो करा या टिप्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cake Baking Tips: घरी बनवलेला केक खराब होतो का? परफेक्ट बेकिंगसाठी फॉलो करा या टिप्स

Cake Baking Tips: घरी बनवलेला केक खराब होतो का? परफेक्ट बेकिंगसाठी फॉलो करा या टिप्स

May 09, 2024 11:07 PM IST

Cooking Tips: बहुतेक लोकांना केक घरी बनवणे कठीण जाते. कारण काही वेळा तो बेकिंग दरम्यान खराब होतो. येथे जाणून घ्या परफेक्ट बेकिंगच्या टिप्स, ज्या फॉलो करून तुम्ही मार्केटसारखा केक बनवू शकता.

परफेक्ट केक बेकिंगसाठी टिप्स
परफेक्ट केक बेकिंगसाठी टिप्स (freepik)

Tips To Bake Cake: वाढदिवस, अॅनिव्हर्सरी किंवा कोणताही विशेष दिवस आला की आपण सेलिब्रेशनसाठी केक ऑर्डर करतो. तर काही लोकांना ते घरी बनवायलाही आवडतं. तुम्ही सुद्धा यावेळी मदर्स डे ला घरी केक बनवण्याचा विचार करत असाल, पण जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे घरी केक बनवतात परंतु प्रत्येक वेळी केकमध्ये काहीतरी कमी राहत असेल तर समजून घ्या की तुम्ही बेकिंगमध्ये चूक करत आहात. जर तुम्हाला केक परफेक्ट पद्धतीने बेक करायचा असेल तर येथे दिलेल्या टिप्स फॉलो करा. या टिप्स फॉलो करून तुम्ही बाजारासारखा परफेक्ट केक घरीच बनवू शकता.

परफेक्ट केक बेक करण्यासाठी टिप्स (Tips to Bake Perfect Cake)

१. तुम्ही ज्या पॅनमध्ये केक बेक करत आहात त्या पॅनला नेहमी ग्रीस करा आणि त्यावर बटर पेपर पसरवा. असे केल्याने तुमचा केक थंड झाल्यावर नीट बाहेर येईल.

२. केक बनवण्यासाठी प्रथम ओव्हन पूर्णपणे गरम होऊ द्या. याशिवाय केक योग्य तापमानात बेक करा.

३. जर तुम्ही परफेक्ट केक बेक करण्याचा प्रयत्न करत असाल तर तो ओव्हनच्या मध्यभागी ठेवा. असे केल्याने केक चांगला बेक होतो असे मानले जाते.

४. योग्य आकाराच्या पॅनमध्ये केक बेक करा. केक बनवण्यासाठी तुम्ही खराब आकाराचे पॅन वापरल्यास, ते केक असमानपणे बेक करेल.

५. केक बनवण्यासाठी ताजे साहित्य वापरा. खरं तर जुन्या गोष्टी वापरल्याने त्याची चव खराब होऊ शकते. जुना बेकिंग

सोडा वापरू नका. कारण तो नीट काम करत नाही.

६. तुम्ही पहात असलेल्या रेसिपीनुसार साहित्य घाला. त्याऐवजी दुसरे काहीही घेतल्याने चव खराब होऊ शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner