Tips and Tricks to Make French Fries: फ्रेंच फ्राईज संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये किंवा विचित्र वेळी लागलेली भूक शांत करण्यासाठी खाल्ले जाऊ शकते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ खायला सर्वांनाच खूप आवडतो. त्यामुळेच प्रत्येक जण ते आवडीने खातात. मात्र, बाजारात मिळणाऱ्या फ्राईजचा पोत आणि चव यात बराच फरक आहे. घरी बनवलेले फ्राईजमध्ये अनेकदा तेल भरलेले राहते. तर काही लोक तक्रार करतात की ते तितके कुरकुरीत होत नाहीत. अशा वेळी जर तुम्हाला मार्केटप्रमाणे फ्रेंच फ्राइज बनवायचे असतील तर तुम्ही काही ट्रिक्स फॉलो करू शकता. या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्ही रेस्टॉरंटसारखे फ्रेंच फ्राईज घरी सहज बनवू शकता.
फ्राईजमध्ये जास्त तेल भरले असेल तर बटाटे कमी गरम तेलात तळण्याची चूक करू नका. जर तुम्ही फ्रीजरमध्ये फ्राईज साठवून ठेवले असतील तर फ्रीजमधून काढून लगेच फ्राय करू नका. फ्राईज नेहमी हाय फ्लेमवर हलके तपकिरी होईपर्यंत तळा.
फ्राईज बनवण्यासाठी बटाटे दोनदा तळले जातात, तेव्हा बटाटे कुरकुरीत, क्रिस्पी होतात. यासाठी सर्वप्रथम फ्राईज हलक्या आचेवर प्रथमच डीप फ्राय करावेत. मग ते एका प्लेटमध्ये बाहेर काढा आणि आता गॅसची फ्लेम वाढवा. नंतर पुन्हा कढईत बटाटे घालून कुरकुरीत होईपर्यंत डीप फ्राय करा.
घरी फ्राईज बनवताना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. चांगले फ्राय करण्यासाठी बटाटे कमीत कमी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. असे केल्याने बटाट्यामध्ये असलेला स्टार्च बाहेर पडतो. जेव्हा आपण असे करता तेव्हा बटाटे एकत्र चिकटण्याची शक्यता कमी होते.
रेस्टॉरंटसारखे फ्राईज बनवायचे असतील तर तांदळाच्या पिठाचा वापर करा. त्याचा वापर करण्यासाठी बटाटे कापल्यानंतर त्यावर तांदळाचे पीठ घालून नंतर डीप फ्राय करावे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)