Cooking Hacks: हिवाळ्यात दही लागत नाही का? या एका ट्रीकने पटकन होईल सेट
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Hacks: हिवाळ्यात दही लागत नाही का? या एका ट्रीकने पटकन होईल सेट

Cooking Hacks: हिवाळ्यात दही लागत नाही का? या एका ट्रीकने पटकन होईल सेट

Published Jan 10, 2024 10:48 PM IST

Cooking Tips: हिवाळ्यात अनेकदा दही सेट व्हायला वेळ लागतो. त्यामुळे दही आंबट होऊ शकते. हिवाळ्यात परफेक्ट दही सेट करण्यासाठी ही ट्रिक मदत करेल.

हिवाळ्यात परफेक्ट दही सेट करण्यासाठी टिप्स
हिवाळ्यात परफेक्ट दही सेट करण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Make Perfect Curd in Winter: दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदानुसार दह्यापासून बनवलेले ताक प्यायल्याने पोटाच्या समस्या कमी होतात. तसेच प्रोबायोटिक्स समृद्ध असल्याने ते आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी देखील चांगले आहे. हल्ली दही बाजारात सहज उपलब्ध होते. पण अनेकांना घरी बनवलेले दही खायला आवडते. जेणेकरून ताजे दही मिळू शकेल. पण हिवाळ्यात अनेकदा दही नीट सेट होत नाही. तर कधी कधी सेट व्हायला बराच वेळ लागतो ज्यामुळे त्याची चव आंबट होते. तुम्हालाही हिवाळ्यात परफेक्ट दही लावायचे असेल तर या ट्रिक्स ट्राय करा.

हिवाळ्यात दही सेट करण्याची सोपी पद्धत

हिवाळ्यात भांडी लवकर थंड होतात. त्यामुळे दूध लवकर थंड होते आणि दही सेट व्हायला वेळ मिळत नाही. कारण दह्याला सेट करण्यासाठी थोडेसे गरम तापमान आवश्यक असते. अशावेळी ही पद्धत खूप उपयुक्त आहे.

दही सेट करण्याची सोपी पद्धत

- दही सेट करण्यासाठी दूध उकळवा आणि थोडे थंड करा. हात सहन करू शकतील इतके थंड ते असावे.

- आता थोडे दही घेऊन ते भांड्याच्या चारही बाजूने लावा. नंतर कोमट दूध दह्याच्या भांड्यात टाका. आणि अजून थोडं दही घाला.

- लक्षात ठेवा की दही जास्त थंड नसावे. तसेच दही सेट करण्यासाठी वापरलेले दूध जास्त थंड नसावे.

- आता कुकरमध्ये थोडे पाणी टाकून गरम करा. या कुकरमध्ये सेट करण्यासाठी ज्या भांड्यात दही ठेवले आहे ते भांडे ठेवा.

- दह्याचे भांडे चांगले बंद करा. दही सेट करण्यासाठी टिफिन वापरणे योग्य होईल.

- आता कुकरवर झाकण ठेवून ३-४ तास राहू द्या. अगदी सहज आणि कमी वेळात दही तयार होईल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते आंबट होणार नाही. या पद्धतीने तुम्ही हिवाळ्यात परफेक्ट दही लावू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner