Helpful Cooking And Kitchen Tips: सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरू आहे. अशावेळी डबा बंद गोष्टींमध्ये मॉईश्चर पकडल्याने वस्तू खराब होऊ लागतात. थंडीच्या दिवसांत किचनमधील अशा अनेक पदार्थ खराब होण्याचा धोका वाढलेला असतो. थंडीच्या मोसमात हवामान थंड असते आणि घरात देखील दमट वातावरण असते. पुरेसं ऊन देखील नसल्याने वातावरण कोंदट होते. अशावेळी अनेकदा घरातील किचनमध्ये डब्यात ठेवलेला रवा, मैदा, गव्हाचे पीठ यांना किड लागते. अशावेळी डबा बंद पीठ खराब होऊ नये, त्याला कीड लागू नये यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर, जाणून घेऊया 'या' साठीच्या काही खास टिप्स...
- पीठ नेहमी हवा बंद अर्थात एअर टाईट डब्यात ठेवा. पीठाला जेव्हा हवा लागते, तेव्हा पिठामध्ये किडे पडण्याची अथवा अळी होण्याची शक्यता अधिक असते. पीठाला हवा लागू नये आणि त्यात मॉईश्चर पकडू नये, यासाठी घट्ट झकणाच्या स्टील किंवा प्लास्टिक डब्याचा वापर करा.
- मीठामुळे पीठाला कीड लागत नाही. म्हणूनच पीठ डब्यात ठेवताना त्यात मीठाचे मोठे खडे देखील ठेवा.
- माचीसच्या काडीवर सल्फर लावलेले असते. सल्फरमुळे कीड रोखण्यास मदत होते. माचीचा काही काड्या डबीत ठेवून, ती डबी पीठाच्या डब्यात ठेवा.
- हिंगाचे मोठे तुकडे कापडात बांधून त्याच्या पुरचुंड्या बनवा. या तीन-चार पुरचुंड्या पीठाच्या डब्यात टाकून ठेवा. हिंगाच्या उग्र वासामुळे पीठात कीड आणि अळ्या लागत नाहीत.
- काळी मिरी आणि कापूर एका रिकाम्या माचीसच्या डबीत भरून, ही डबी चांगली हलवून घ्या. यातून हलका गंध येऊ लागला की, ती डबी पीठाच्या डब्यात ठेवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)