मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cholesterol Control: ताकाचे सेवन खराब कोलेस्ट्रॉल करेल कमी!

Cholesterol Control: ताकाचे सेवन खराब कोलेस्ट्रॉल करेल कमी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 30, 2023 11:16 PM IST

Buttermilk Benefits: ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि पोटाच्या समस्याही दूर होतात, पण तुम्हाला माहित आहे का की याच्या मदतीने कोलेस्ट्रॉलही कमी करता येते.

Cholesterol Control
Cholesterol Control (Freepik)

Cholesterol Lowering Diet: आहारात काही पदार्थ समाविष्ट करणे गरजेचे असते. सकस आहार आपल्याला हेल्दी ठेवायला मदत करते. आहार उत्तम असेल तर आरोग्य राखले जाते. काही आजार होऊच नये म्हणून तुम्ही काही पदार्थांचा समावेश आहारात करायला हवे. वाढलेलं कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर समस्या आहे. यावर ताक फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात जेव्हा आपल्याला हायड्रेटेड राहण्याची गरज असते तेव्हा हे पेय आवर्जून सेवन केले जाते. बद्धकोष्ठतेचा सामना करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. ताकाच्या अनेक गुणधर्मांमुळे, अनेकांना वर्षभर दररोज एक ग्लास ताक पिणे आवडते. पॅकबंद दुधाच्या पदार्थांऐवजी घरी ताक तयार करणे केव्हाही चांगले. आपल्यासाठी ताक पिणे का महत्त्वाचे आहे आणि ते उच्च कोलेस्टेरॉल कमी करू शकते हे जाणून घेऊयात.

ताक प्यायल्याने होईल फायदा

वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे गंभीर समस्या होऊ शकतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका होण्याचा धोका असतो. अशा स्थितीत ताक नक्कीच प्यावे. ताक कसं बनवायचं याबद्दल जाणून घेऊयात...

लागणारे साहित्य

अर्धा कप दही

दीड कप पाणी

जवस

जिरे

मेथी दाणे

जाणून घ्या कृती

> सर्व प्रथम, दही आणि पाणी घ्या आणि छान मिसळून घ्या. चांगले फेटून नंतर बाजूला ठेवा.

> आता जवस, जिरे आणि मेथीचे दाणे समान प्रमाणात घेऊन बारीक वाटून घ्या.

> ताक एका ग्लासमध्ये ठेवा आणि त्यात १ टेबलस्पून फ्लेक्ससीड, जिरे आणि मेथीचे मिश्रण चांगले मिसळा.

तुम्ही याचे सेवन दुपारच्या जेवणासोबत किंवा दुपारी ३-४ च्या सुमारास जेवणानंतर करू शकता. हे वजन कमी करणे आणि उच्च कोलेस्टेरॉलवर नैसर्गिक पद्धतीने हल्ला करते.

WhatsApp channel