Thyroid Care: थायरॉईडपासून लवकर आराम मिळवण्यासाठी औषधासोबत करा या पदार्थांचे सेवन!-consume these foods along with medicine to get quick relief from thyroid ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Thyroid Care: थायरॉईडपासून लवकर आराम मिळवण्यासाठी औषधासोबत करा या पदार्थांचे सेवन!

Thyroid Care: थायरॉईडपासून लवकर आराम मिळवण्यासाठी औषधासोबत करा या पदार्थांचे सेवन!

Mar 13, 2024 10:38 AM IST

Diet in Thyroid: असे काही पदार्थ आहेत जे थायरॉईडची समस्या असल्यास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

how to get quick relief from thyroid
how to get quick relief from thyroid (freepik)

Lifestyle News in Marathi: आजकल बदलेल्या लाइफस्टाइलमुळे अनेक आजार जडले आहेत. शहरातील बसलेल्या जीवनशैलीमुळे छोटे ते मोठे असे अनेक आजार लहान ते मोठे सगळ्यांनाच जडत आहेत. असाच एक आजार म्हणजे थायरॉईड. थायरॉईड होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे खाण्याच्या सवयींमधील गडबड किंवा विचित्र खाण्यापिण्याच्या सवयी. आजकाल लोक जास्त फास्ट आणि जंक फूडचे सेवन जास्त प्रमाणत करतात. यामुळे ते अशा आजारांना बळी पडतात. याच कारणांमुळे तुम्ही तुमचा आहार सुधारला तर तुम्ही स्वतःला अशा आजारांपासून दूर ठेवू शकता. असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही थायरॉईड असल्यास तुम्ही सेवन केल्यास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

काय खायला हवं?

> थायरॉईडचा आजार असल्यास ब्रोकोली, फ्लॉवर अशा भाज्या आवर्जून खा. यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.

Yoga Festival: ऋषिकेशमध्ये साजरा होणार आंतरराष्ट्रीय योग महोत्सव! जाणून घ्या तारीख आणि अन्य डिटेल्स!

> हायपोथायरॉईडीझम असल्यास व्हिटॅमिन बी१२ विशेषतः उपयुक्त आहे. यासाठी तुम्ही रोजच्या आहारात अंडी, मांस, मासे, शेंगा, दूध आणि अक्रोडाचे सेवन करा. यातून तुम्हाला खूप फायदा होईल. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे थायरॉईड समस्या उद्भवू शकतात.

> तुमच्या आहारात कॉड लिव्हर ऑइल, सॅल्मन, ट्यूना आणि सार्डिन सारख्या मासे समाविष्ट करा.

Weight loss tips: या नियमाचं करा पालन, वजन कमी करण्यास होईल मदत!

> मशरूम, दूध, सोया आणि सोयाची उत्पादने, अंडी आणि बटरचे सेवन वाढवा.

Iron level:या ५ पदार्थात असतात भरपूर प्रमाणात लोह, कमतरता टाळण्यासाठी आहारात करा समावेश!

> आले सुद्धा आहारात घ्या. यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. हे आवश्यक खनिजांनी समृद्ध आहे. थायरॉईडमध्ये होणाऱ्या जळजळ वर आले हा एक उत्तम उपाय आहे. आल्याचा चहा पिण्यास सर्वात सोपा आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)