Constipation Tips: शौचास साफ होत नाही, पोटात प्रचंड वेदना होतात? मग ताकात मिसळून प्या 'हे' २ पदार्थ, मिळेल आराम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Constipation Tips: शौचास साफ होत नाही, पोटात प्रचंड वेदना होतात? मग ताकात मिसळून प्या 'हे' २ पदार्थ, मिळेल आराम

Constipation Tips: शौचास साफ होत नाही, पोटात प्रचंड वेदना होतात? मग ताकात मिसळून प्या 'हे' २ पदार्थ, मिळेल आराम

Nov 15, 2024 10:31 AM IST

Constipation Remedies: पॅक्ड स्नॅक्स, बर्गर, पिझ्झा इत्यादी खाल्ल्याने शरीरात फायबरची कमतरता निर्माण होते. फायबर आपली आतडे निरोगी ठेवण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

Home Remedies for Constipation
Home Remedies for Constipation (freepik)

Home Remedies for Constipation:   आजकाल जीवनशैली आणि आहाराच्या सवयी बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांना प्रोत्साहन देत आहेत. आधुनिक जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत. ज्याचा पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. आधुनिक अन्नामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न जसे पॅक्ड स्नॅक्स, बर्गर, पिझ्झा इत्यादी खाल्ल्याने शरीरात फायबरची कमतरता निर्माण होते. फायबर आपली आतडे निरोगी ठेवण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. त्याऐवजी फायबर युक्त अन्न जास्त खाल्ल्यास पचनसंस्था निरोगी राहते. पण योग्य आहार, शारीरिक हालचाली, मानसिक संतुलन आणि औषधांचा योग्य वापर करून आपण या समस्येला तोंड देऊ शकतो.

निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून बद्धकोष्ठता बरा होऊ शकतो आणि शरीर अधिक चांगले कार्य करू शकते. अशा परिस्थितीत, दीर्घकाळ बद्धकोष्ठता असलेल्या लोकांसाठी, जिरे आणि ओवा मिसळून ताक पिणे हा एक प्रभावी घरगुती उपाय असू शकतो. ताक, जिरे आणि ओवा यांचे मिश्रण पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करते. या मिश्रणामुळे गॅस, अपचन आणि पोटाच्या इतर समस्यांपासूनही आराम मिळतो.

कसे बनवावे हे ताक-

-सर्वप्रथम एक ग्लास ताजे ताक घ्या.

-त्यात एक चमचा भाजलेले जिरे पावडर आणि अर्धा चमचा ओवा पावडर घाला.

-तुम्ही या मिश्रणात चिमूटभर काळे मीठ देखील घालू शकता. ज्यामुळे त्याची चव आणखी चांगली होईल.

-हे ताक चांगले मिसळा आणि सकाळी किंवा दुपारच्या जेवणानंतर प्या.

हे मिश्रण कसे कार्य करते?

ताक- ताक हे प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे. जे पचनसंस्थेतील चांगल्या बॅक्टेरियाचे संतुलन राखते. यामुळे पोट थंड होते आणि आतडे निरोगी राहतात.

जिरे- जिऱ्यामध्ये अँटी इन्फ्लीमेंटरी गुणधर्म असतात जे गॅस आणि ऍसिडिटी कमी करण्यास मदत करतात. हे पाचक एंझाइम सक्रिय करते. ज्यामुळे अन्न योग्यरित्या पचले जाते.

ओवा- ओव्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असते. जे पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.

लक्षात घेण्यासारख्या गोष्टी-

या मिश्रणाचे नियमित सेवन केल्याने हळूहळू बद्धकोष्ठता सुधारते. हा उपाय नैसर्गिक आहे. पण बद्धकोष्ठतेची समस्या दीर्घकाळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हा घरगुती उपाय पाचन तंत्र मजबूत करतो आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतो.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner