मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dates Benefits: सर्दी खोकल्यापासून बद्धकोष्ठताची समस्या दूर करते खजूर, हिवाळ्यात खाल्ल्याने मिळतात आश्चर्यकारक फायदे

Dates Benefits: सर्दी खोकल्यापासून बद्धकोष्ठताची समस्या दूर करते खजूर, हिवाळ्यात खाल्ल्याने मिळतात आश्चर्यकारक फायदे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 15, 2024 07:29 PM IST

Winter Health Care: हिवाळ्यात खजूर खाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नियमित खजूर खाल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात ते पाहा.

हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे
हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे (unsplash)

Health Benefits of Dates: हिवाळ्यात लोकांना गरम प्रभाव असलेल्या गोष्टी आहारात घ्यायला आवडतात. अशा आरोग्यदायी गोष्टींमध्ये खजूरचाही समावेश होतो. खजूर त्यांच्या हीलिंग गुणधर्मासाठी ओळखल्या जाते. आहारात याचा समावेश केल्याने व्यक्ती अनेक आजारांपासून दूर राहते आणि एनर्जेटिक फिल करते. खजूरमध्ये लोह, कॅल्शियम, खनिजे, फॉस्फरस, अमिनो अॅसिड यांसारखे पोषक घटक आढळतात. हे सर्दीपासून, रक्ताची कमतरता आणि बद्धकोष्ठतापर्यंतच्या समस्यांपासून आराम देते. जाणून घ्या हिवाळ्यात खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे.

सर्दी आणि खोकल्यापासून आराम

खजुरांचा प्रभाव हा गरम असतो. हिवाळ्यात खजुराचे नियमित सेवन केल्यास सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून दूर राहता येते. हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास होणे सामान्य आहे. अशा स्थितीत दुधात २-३ खजूर मिसळून रोज प्यायल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.

एनिमियाच्या समस्येपासून मुक्ती

खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी सहज वाढवता येते. ज्या लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे त्यांना नियमितपणे खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूरमुळे रक्ताची कमतरतेची समस्या दूर होते.

बद्धकोष्ठता

खजूर खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. त्यामुळे व्यक्तीला बद्धकोष्ठतेची तक्रार होत नाही. खजूरमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते, जे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास आणि पोटात मुरडा, क्रॅम्प आणि लूज मोशन बरे करण्यास मदत करते.

हाडांचे आरोग्य

हिवाळ्यात गुडघेदुखीचे प्रमाण खूप वाढते. अशा परिस्थितीत रोज खजूर खाल्ल्याने या समस्येवर काही प्रमाणात मदत होऊ शकते. खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात सेलेनियम, मॅंगनीज, तांबे आणि मॅग्नेशियम असते. हाडांचे आरोग्य राखण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी हे सर्व पोषक तत्व आवश्यक मानले जातात.

 

प्रथिनांनी समृद्ध

खजूरमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते, जे आपल्या स्नायूंना मजबूत ठेवण्यास मदत करते. अनेक वेळा जिम करणारे लोक नैसर्गिक प्रथिने आणि गोडपणा मिळविण्यासाठी त्यांच्या आहारात खजूर समाविष्ट करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel