Coffee with a drone: ड्रोन आजकाल फार नॉर्मल झालं आहे. आजकाल जिकडे पाहावे तिकडे ड्रोन कॅमेरे आपले चमत्कार दाखवताना दिसतात. सुरवातीला बेसिक स्वरूपात आलेले ड्रोन आता नवनवीन स्वरूपात आले आहेत. ड्रोन अनेक सुंदर शॉर्ट घेतले जातात. अवघड ठिकाणांच्या फोटोग्राफीसाठी लोक आता ड्रोनची मदत घेतात. एवढेच नाही तर ड्रोन कॅमेऱ्यातून आपण कधी बघू शकलो नसतो असे अप्रतिम नजारे पाहता येतात. पण, हे सोडूनही आता ड्रोनचा वापर केला जातो. व्हायरल व्हिडीओमध्ये ड्रोन फोटोग्राफी करताना दिसत नाहीये तर लोकांना कॉफी देताना दिसत आहे.
कोलकात्यात एक कॅफे आहे, जे ड्रोनद्वारे लोकांना कॉफी सर्व्ह करते. याच हटके आणि खास वैशिष्ट्यामुळे हे रेस्टॉरंट लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. सॉल्ट लेक येथे कलकत्ता ६४ तुम्हाला तुमची आवडती कॉफी ऑर्डर केली की काही मिनिटांतच तुमच्या कॉफीसह एक ड्रोन तुमच्याकडे जाईल.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की ड्रोनवर कॉफीचा कप ठेवण्यात आला आहे. काही अंतरावर बसलेल्या व्यक्तीच्या दिशेने ड्रोन उडतो. ती व्यक्ती ड्रोनमधून कॉफीचा कप उचलते आणि मग ड्रोन परत येतो. ड्रोनवरून कॉफी सर्व्ह करण्याची ही सेवा फक्त याच रेस्टॉरंटमध्ये अजून तरी उपलब्ध आहे. ही सेवा घरपोच नाही. तुम्ही कॅफेमध्ये असाल तरच तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर आतापर्यंत २२,००० हून अधिक लोकांनी पहिला आहे. या व्हिडीओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली की, हे ठिकाण माझ्यासाठी नेहमीच खास असेल. दुसरा म्हणाला, "आणखी एकदा जाऊया?" तिसऱ्या इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले, 'ठीक आहे, मला ड्रोनसारखी कॉफी मिळेल का... जर होय तर मी आजच येत आहे.'
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या