Disadvantages of coconut water: नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. कारण त्यात भरपूर पोषक घटक असतात. हे प्यायल्याने डिहायड्रेशन होत नाही आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत होते. व्यायामानंतर नारळ पाणी प्यायल्याने स्नायूंना खूप आराम मिळतो. हे सर्व आहेत नारळाच्या पाण्याचे फायदे पण तुम्हाला माहित आहे का की, ते पिण्याचे फायदे तर आहेतच पण काही गंभीर तोटे देखील होऊ शकतात. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे, नारळ पाणी पिण्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. मायो क्लिनिकनुसार, काही आरोग्य समस्या असल्यास, व्यक्तीने नारळ पाणी पिणे टाळावे, अन्यथा समस्या आणखी वाढू शकते.
जर तुम्ही नारळाचे पाणी जास्त प्रमाणात प्यायले तर ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवते. त्यात कार्बोहायड्रेट असते आणि ते जास्त प्रमाणात प्यायल्याने कॅलरीज वाढतात. अशा स्थितीत याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढू शकते आणि रक्तातील साखरेची पातळीही वाढते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही दररोज एक ग्लास पेक्षा जास्त नारळाचे पाणी पिणे टाळावे.
जर तुम्हाला कमी रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही नारळ पाणी पिण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नारळाच्या पाण्यात असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाबाची पातळी आणखी कमी होऊ शकते. तसेच उच्च रक्तदाबाचा धोका असलेल्या लोकांना नारळाचे पाणी सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. विशेषत: तुम्हाला तुमचे बीपी कोणत्याही औषधाशिवाय सामान्य ठेवायचे असेल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.
जर तुम्ही नारळाच्या पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्याचा तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते आणि जास्त पोटॅशियममुळे अतिसार होऊ शकतो. तुम्हाला ब्लोटींगचा त्रास होत असला तरीही तुम्ही जास्त नारळ पाणी पिणे टाळावे. एका वेळी जास्त नारळाचे पाणी प्यायल्याने पोटात जास्त पाणी साचते, ज्यामुळे पोट फुगणे आणि बद्धकोष्टता होऊ शकते.
नारळाच्या पाण्यात लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म असल्याने ते जास्त प्रमाणात प्यायल्याने वारंवार लघवी होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही नारळाच्या पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केले तर ते तुम्हाला अनेक फायदेही देऊ शकतात.
नारळाचे पाणी प्यायल्याने काही लोकांमध्ये ऍलर्जीची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे ट्री नट ॲलर्जीसोबत इतर ॲलर्जी होण्याचा धोका असतो. जर तुम्हाला नारळाचे पाणी पिण्याची ऍलर्जी असेल तर तुम्हाला खाज सुटणे, जळजळ होणे, लालसरपणा येणे इ. समस्या उद्भवतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या