Cleaning Tips: किचन मधील या गोष्टी वेळेवर बदलणे आहे गरजेचे, नाहीतर तुम्ही पडाल आजारी-cleaning tips replace these things in kitchen regularly to maintain hygiene and protect from bacteria ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cleaning Tips: किचन मधील या गोष्टी वेळेवर बदलणे आहे गरजेचे, नाहीतर तुम्ही पडाल आजारी

Cleaning Tips: किचन मधील या गोष्टी वेळेवर बदलणे आहे गरजेचे, नाहीतर तुम्ही पडाल आजारी

Sep 12, 2024 09:29 PM IST

Kitchen Cleaning Tips: स्वयंपाकघरात हायजीन राखायचे असेल तर स्वच्छतेसह या गोष्टी वेळोवेळी बदलत राहा.

cleaning tips किचन क्लीनिंग टिप्स
cleaning tips किचन क्लीनिंग टिप्स (unsplash)

Replace These Things in Kitchen Regularly: स्वयंपाकघराची स्वच्छता खूप महत्वाची आहे. कारण ही जागा सर्वात जास्त जीवाणूंना आकर्षित करते. घरातील प्रत्येक सदस्याला निरोगी ठेवायचे असेल तर स्वयंपाकघरातील स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: स्वयंपाकघरातील त्या गोष्टी ज्याच्या मदतीने साफसफाई केली जाते. या सर्व गोष्टी वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे. या गोष्टींमध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात. जर या गोष्टी तुमच्या स्वयंपाकघरात बराच काळ वापरल्या जात असतील तर त्या ताबडतोब काढून टाका.

भांडी घासण्याचे स्पंज

प्रत्येक घरात भांडी घासण्यासाठी स्पंज वापरले जातात. पण बऱ्याच घरांमध्ये हा स्पंज पूर्णपणे खराब होईपर्यंत बदलला जात नाही. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. जर तुमचा स्पंज १५-२० दिवस सतत वापरला जात असेल तर तो बदलून घ्या. भांडे घासण्याच्या स्पंजमध्ये भरपूर बॅक्टेरिया असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असतात.

सिलिकॉन स्पॅटुला

आजकाल किचनसाठी मॉर्डन भांड्यांचा वापर केला जात आहे. सिलिकॉनपासून बनवलेले चमचे ज्याला स्पॅटुला म्हणतात हे वापरणे अगदी सामान्य आहे. पण एकदा हे स्पॅटुला कापले किंवा फाटले की ते काढून टाकावेत. अन्यथा त्यांचे बारीक कण अन्नात विरघळण्याची भीती असते.

किचन डस्टबिन

स्वयंपाकघरात ठेवलेले डस्टबिन रोज घाणेरडा होतो. त्याच्या स्वच्छतेकडे सर्वांचे लक्ष असते. पण जर हा डस्टबिन जुना झाला असेल तर तो ताबडतोब काढून नवीन आणा. आपल्या घरात बॅक्टेरिया वाढण्यासाठी ही एक सोपी जागा आहे.

किचन टॉवेल

स्वयंपाकघरातील भांडी साफ करणे असो किंवा हात पुसणे, एक एक्स्ट्रा कापड ठेवले जाते. या कापडाची वेळोवेळी साफसफाई करणे आवश्यक आहे. तसेच काही दिवसांनी त्यात बदल करणे आवश्यक आहे. जेणेकरून जीवाणूंची वाढ होणार नाही.

नॉनस्टिक भांडे

जुने लोखंडी कढई वापरण्यास काहीच हरकत नाही. परंतु नॉनस्टिक पॅन बऱ्याच वर्षांपासून वापरात असल्यास ते बदला. जर नॉनस्टिक भांडीवर स्क्रॅच असतील किंवा त्यांचे कोटिंग हलका झाला असेल तर ते बदलून घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग