Tips to Remove Holi Colour Stains: रंग खेळण्याने केवळ त्वचा आणि केसांना नुकसान होत नाही तर काही वेळा घराच्या भिंती, मार्बल, टाइल्सही रंगतात. हे साफ करणे खूप कठीण होते. कारण कोरडे झाल्यानंतर ते डाग सोडतात. भिंती, मार्बल आणि टाइल्सवर रंगाचे डाग पडले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी हा प्रभावी घरगुती उपाय करा.
जर कोरडे रंग जमिनीवर किंवा कोणत्याही पृष्ठभागावर पडले असतील तर ते पाण्याने स्वच्छ करू नका. त्यापेक्षा झाडू घेऊन गोळा करून फेकून द्या. पाण्याने स्वच्छ केल्यावर हा रंग पक्का होतो आणि काढायला वेळ लागतो.
मार्बलवर रंगाचा डाग असल्यास ते स्वच्छ करण्यासाठी कॉर्न स्टार्च पाण्यात विरघळवून त्याची पेस्ट तयार करा. आता या कॉर्न स्टार्चची पेस्ट रंग असलेल्या जागेवर लावा आणि राहू द्या. काही तासांनंतर कापडाने पुसून पेस्ट काढून टाका. नंतर पाणी आणि साबणाने स्वच्छ करा.
जर टेबल, सोफा, साइड टेबल किंवा सेंटर टेबल, कोणत्याही लाकडी फर्निचरवर होळीचा रंग सोडला असेल तर या डागापासून मुक्त होण्यासाठी कॉटन बॉलमध्ये नेलपॉलिश रिमूव्हर बुडवून डागावर लावा. सर्व रंगाचे डाग पूर्णपणे स्वच्छ होतील.
होळीचा रंग भिंतींवर लागला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जाऊ शकतात. गरम पाण्यात व्हाईट व्हिनेगर आणि लिंबू घाला. आता स्वच्छ सुती कापड यात भिजवा, पिळून घ्या आणि रंग लागलेल्या भिंतीवर घासून घ्या. सर्व रंग निघून जातील. नंतर स्वच्छ पाण्याने भिंत स्वच्छ करा.
टाइल्सवरील रंग साफ करण्यासाठी लिंबू, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरा. याच्या पेस्टने घासून घ्या आणि नंतर कोमट पाण्याने पुसून टाका. असे केल्याने रंग निघून जाईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)