Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईसाठी फॉलो का 'या' क्लिनिंग टिप्स, आरशासारखं चकाकेल घर
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईसाठी फॉलो का 'या' क्लिनिंग टिप्स, आरशासारखं चकाकेल घर

Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईसाठी फॉलो का 'या' क्लिनिंग टिप्स, आरशासारखं चकाकेल घर

Published Oct 12, 2024 03:03 PM IST

Diwali Cleaning Hacks: प्रत्येक घरात दिवाळीच्या काही दिवसाआधीच साफसफाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही हॅक सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही घरात असलेल्या वस्तूंसह घर पूर्णपणे स्वच्छ करू शकता.

Diwali Cleaning Tips
Diwali Cleaning Tips (freepik)

Diwali Cleaning Tips:  खरं तर प्रत्येक घरात दररोज स्वच्छता केली जाते. पण दिवाळीपूर्वीची स्वच्छता ही काही वेगळीच असते. या दरम्यान बारकाईने साफसफाई केली जाते. प्रत्येक घरात दिवाळीच्या काही दिवसाआधीच साफसफाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही हॅक सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही घरात असलेल्या वस्तूंसह घर पूर्णपणे स्वच्छ करू शकता. इतकेच नव्हे तर या टिप्स फॉलो केल्याने तुमच्या घरातील प्रत्येक वस्तूवर एक नवीच चमक येईल. चला तर मग जाणून घेऊया या टिप्स नेमक्या कोणत्या आहेत.

असे वापरा जुने उशी कव्हर्स-

जुने उशाचे कव्हर्स अनेकदा फेकले जातात किंवा कापून कापूस काढून वापरले जातात. उशी साफ करणे हे सर्वात कठीण काम वाटते. अशा परिस्थितीत, तुम्ही उशीचा वापर पंख्यावरील धूळ साफ करण्यासाठी करू शकता. यासाठी पंख्यावर उशीचे कव्हर ठेवा आणि नंतर ते स्वच्छ करा.

बाथरूमच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त ठरेल व्हिनेगर-

बाथरुममधील नळाच्या सभोवतालची घाण साफ करण्यासाठी व्हिनेगरचा वापर अवश्य करा. यासाठी तुम्ही, एक कापड व्हिनेगरमध्ये भिजवा आणि ते थेट नळाच्या तोंडावर ठेवा. नंतर काही वेळ ठेवल्यानंतर कापडाने स्वच्छ करा. नंतर पाण्याने धुवा. अशाप्रकारे नळावरची सर्व घाण निघून जाईल.

साफसफाईसाठी उपयुक्त ठरेल शेव्हिंग क्रीम-

कार्पेट असो किंवा कोणत्याही दागिन्यांची चमक असो, शेव्हिंग क्रीम प्रत्येक गोष्ट स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ते वापरण्यासाठी, तुम्हाला जी वस्तू स्वच्छ करायची आहे त्यावर काही काळ क्रीम लावा आणि नंतर ब्रशने स्वच्छ करा. त्याच्या मदतीने तुम्ही कारच्या सीटवर लावलेले कव्हरही स्वच्छ करू शकता.

या ट्रीकने चमकेल फर्निचर-

घरात ठेवलेल्या लाकडी वस्तूंवर अनेकदा डाग पडतात. अशा स्थितीत ते घाणेरडे दिसू शकते. मग ते किचन कॅबिनेट असो किंवा लाकडी टेबल. ते स्वच्छ करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलची मदत घ्या. लाकडी वस्तूंची चमक टिकवून ठेवण्यासाठी हे तेल खूप उपयुक्त ठरू शकते. ते वापरण्यासाठी लाकडी वस्तूवर ऑलिव्ह ऑइल काही काळ टाका आणि नंतर काही काळ राहू द्या. मग स्वच्छ सुती कापडाने पुसून स्वच्छ करा.

बेकिंग सोडा-

बेकिंग सोडा स्वच्छतेसाठी सर्वोत्तम आहे. अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिक्स करून पेस्ट बनवा आणि नंतर साफसफाईसाठी वापरा.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner