Cleaning Hacks: गादीवर चिवट डाग पडून कुबट वास येतोय? 'या' हॅकने पुन्हा नव्यासारखी चमकेल गादी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cleaning Hacks: गादीवर चिवट डाग पडून कुबट वास येतोय? 'या' हॅकने पुन्हा नव्यासारखी चमकेल गादी

Cleaning Hacks: गादीवर चिवट डाग पडून कुबट वास येतोय? 'या' हॅकने पुन्हा नव्यासारखी चमकेल गादी

Published Jul 31, 2024 03:49 PM IST

Tips to Get Stains Out of a Mattress: तुमच्या बेडरूममध्ये पसरलेल्या गादीवर चहा-कॉफी किंवा जेवणाचे डाग पडले असतील. किंवा ज्यांच्या घरात लहान मुले आहेत त्यांच्या घरातील गाद्यांवर लघवीचे आणि विविध औषधांचे डाग दिसून येतात. बऱ्याचवेळा हे डाग इतके वाईट दिसतात की, तुम्ही नवीन गादी घेण्याचा विचार सुरु करता.

Tips to Get Stains Out of a Mattress: गादीचे चिवट डाग आणि कुबट वास दूर करण्यासाठी टिप्स
Tips to Get Stains Out of a Mattress: गादीचे चिवट डाग आणि कुबट वास दूर करण्यासाठी टिप्स

Tips to Get Stains Out of a Mattress: सतत धावपळ आणि दिवसभर कष्ट केल्यानंतर शांत झोप घेण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला पलंगावर पसरलेल्या चांगल्या गादीची आवश्यकता असते. कारण झोपताच तो आपल्या स्वप्नांच्या दुनियेत रमू शकतो. पण दिवसभराच्या ताणतणावाला सामोरे गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला दुर्गंधीयुक्त, धुळीने माखलेल्या गादीवर झोपावे लागले, तर त्याची रात्रीची आणि विश्रांतीची झोप नष्ट होते. त्याला त्या गादीवर झोपण्यास अस्वस्थ वाटू लागते. आणि व्यवस्थित झोप पूर्ण न झाल्याने पुन्हा दुसऱ्या दिवशीचा दिवस आळसात आणि निरुत्साहीपणात वाया जाण्याची दाट शक्यता असते.

जर तुमच्या बेडरूममध्ये पसरलेल्या गादीवर चहा-कॉफी किंवा जेवणाचे डाग पडले असतील. किंवा ज्यांच्या घरात लहान मुले आहेत त्यांच्या घरातील गाद्यांवर लघवीचे आणि विविध औषधांचे डाग दिसून येतात. बऱ्याचवेळा हे डाग इतके वाईट दिसतात की, तुम्ही नवीन गादी घेण्याचा विचार सुरु करता. परंतु आता थेट नवीन गादी घेण्याची गरज नाही. कारण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधील हॅक तुमची समस्या सोडवू शकते. या क्लिनिंग टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या बेडवर पसरलेली जुनी आणि डाग असलेली गादी पुन्हा नव्यासारखी बनवू शकता. चला जाणून घेऊया कसे.

 

गादीचे चिवट डाग आणि कुबट वास दूर करण्यासाठी आवश्यक गोष्टी-

- २ टीस्पून बेकिंग सोडा

- एक कॅप लिक्विड साबण

-४ चमचे फॅब्रिक सॉफ्टनर

- पाण्याचा एक भांडा

- ओला टॉवेल

- इस्त्री

गादीचे डाग साफ करण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करा-

गादीवरील डाग साफ करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला एक पाण्याचे भांडे घ्यावे लागेल त्यात बेकिंग सोडा, लिक्विड सोप, फॅब्रिक सॉफ्टनर यांना एकत्र करून एक लिक्विड तयार करावे. या लिक्विडमध्ये आपण घेतलेला टॉवेल बुडवून तो चांगला पिळून घ्या. आता हा ओला टॉवेल गादीवर ठेवा. यानंतर, ओला टॉवेल गरम इस्त्रीभोवती गुंडाळा आणि ती इस्त्री गादीवर फिरवायला सुरुवात करा. असे पूर्ण गादीवर करून घ्यावे. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की गादीवरील सर्व डाग निघून गेले आहेत. शिवाय तुमच्या गादीतील कुबट वास दूर होईल.

 

या दुसऱ्या पद्धतीनेसुद्धा गादीवरील डाग काढता येतात-

गादीवरील डाग काढून टाकण्यासाठी, आपल्याला प्रथम कपडे धुण्याचा साबण, थंड पाणी आणि मायक्रोफायबर टॉवेल आवश्यक आहे. आता या सर्व गोष्टी टॉवेलवर लावून तो टॉवेल गादीला घासल्याने जवळपास कोणताही डाग निघून जाऊ शकतो. गादी साफ केल्यानंतर बाहेर उन्हात सुकविण्यासाठी ठेवा. अशाने गादीत येणारा कुबट वास दूर होऊन गादी स्वच्छ होईल.

Whats_app_banner