Cleaning Hacks: कपड्यांवर फाऊंडेशन किंवा मेकअपचा डाग पडला का? ते काढण्यासाठी करा हे काम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cleaning Hacks: कपड्यांवर फाऊंडेशन किंवा मेकअपचा डाग पडला का? ते काढण्यासाठी करा हे काम

Cleaning Hacks: कपड्यांवर फाऊंडेशन किंवा मेकअपचा डाग पडला का? ते काढण्यासाठी करा हे काम

Sep 25, 2024 10:22 PM IST

Cleaning Tips: मेकअप, फाउंडेशन किंवा फाउंडेशन बेस क्रीम कापडावर पडल्यास वाळल्यानंतर डार्क डाग तयार होतो. हे डाग साफ करण्याचे काम करेल ही भन्नाट सोपी ट्रिक, ज्याच्या मदतीने सर्व डाग साफ होतील.

Cleaning Tips: कपड्यावरील फाउंडेशनचे डाग काढण्यासाठी टिप्स
Cleaning Tips: कपड्यावरील फाउंडेशनचे डाग काढण्यासाठी टिप्स (shutterstock)

Tips to Remove Foundation or Makeup Stain From Cloths: मेकअप करताना अनेकदा फाउंडेशन किंवा फाउंडेशन बेस क्रीम कपड्यांवर पडते. ते स्वच्छ करणे अवघड आहे. कारण ते वाळल्यानंतर त्याचे डाग पडतात. जे खूप वाईट दिसते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे असे अनेक फाउंडेशन किंवा फाउंडेशन बेस क्रीम आहेत, ज्यांचा डाग जीन्स किंवा कॉटन कपड्यांवरून सहजासहजी निघत नाही. जर तुम्हाला या डागांपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही या सोप्या हॅक्सचा अवलंब करू शकता.

कपड्यांवरील फाउंडेशन किंवा फाउंडेशन बेस क्रीमचे डाग कसे काढावे

कोमट पाण्यात भिजवा

कपड्यावर मेकअप पडला असेल तर एक्स्ट्रा क्रीम काढून कपड्याचा तो भाग गरम पाण्यात भिजवावा. कमीत कमी अर्धा तास किंवा ४५ मिनिटे भिजत ठेवा. नंतर ब्रशने स्वच्छ करा.

शेविंग क्रीमने करा साफ

कापडावर लागलेले फाउंडेशनचे डाग साफ करण्यासाठी प्रथम एक्स्ट्रा फाउंडेशन काढून घ्या. नंतर शेव्हिंग क्रीम लावून सुमारे १५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर पाण्याने धुवून स्वच्छ करा.

कापडावर क्रीम- बेस्ड फाउंडेशन पडल्यास कसे स्वच्छ करावे?

जर कापडावर क्रीम- बेस्ड किंवा ऑईल बेस्ड फाउंडेशन पडले असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी थेट डिटर्जंटने स्वच्छ करा. किंवा लिक्विड किचन डिश वॉश सोप आणि पाणी मिक्स करून द्रावण बनवा. त्यात नेल पॉलिश रिमूव्हरचे काही थेंब घाला. नंतर या द्रावणात कापड भिजवून अर्ध्या तासानंतर स्वच्छ करावे. सर्व डाग साफ होतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner