Christmas Dress Ideas: ख्रिसमस अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सगळीकडे पार्टीची तयारी सुरु झाली आहे. मित्र, परिवारासोबत ख्रिसमस आणि नवीन पार्टीचा आनंद घेण्यासोबतच मुलींना या पार्टीमध्ये सर्वांमध्ये उठून दिसायचे असते. यासाठी त्या अनेक दिवस आधीच तयारी करतात. पण थंडीमुळे अनेक वेळा त्यांना हवे तसे शॉर्ट ड्रेस घालता येत नाही आणि त्यांची स्टाईल खराब होऊ शकते. पण काळजी करू नका तुम्ही जिन्स किंवा पॅन्टमध्ये सुद्धा स्टायलिश लूक मिळवू शकता. तुम्ही जीन्ससोबत हे काही ड्रेस पेअर करू शकता. यामुळे तुम्हाला सुंदर लूक तर मिळेलच शिवाय थंडीपासूनही संरक्षण होईल.
आजकाल बाजारात अनेक प्रकारचे स्वेटर उपलब्ध आहेत. तुम्ही एखादे शिमर वर्कसह स्वेटर सहजपणे खरेदी करू शकता. हाय नेक, राउंड नेक, व्ही नेकलाइन आणि रॅप डिझाइनचे अनेक स्वेटर सुंदर दिसतात. हे जीन्स किंवा पॅन्टसोबत पेअर करता येतात.
कलरफुल किंवा ब्लिंगी इफेक्ट असलेले ब्लेझर देखील पार्टी रेडी लुक देऊ शकतात. ते कोणत्याही स्टायलिश टॉपसह पेअर करता येतात. जेणेकरुन तुम्ही गरज भासल्यास ते काढू शकता आणि सुंदर दिसू शकता.
जर तुम्हाला थंडीपासून स्वतःचे रक्षण करायचे असेल तर तुम्ही वेलवेट फॅब्रिकचा टॉप देखील घालू शकता. तसेच वेलवेट पँट किंवा जंपसूट देखील खूप स्टायलिश लुक देईल. हे स्ट्रॅपी हील्ससह पेअर करा.
लेदर पॅन्टला ओव्हरसाईज स्वेटरसह पेअर करा. राउंड शेप नेकलाइनला खांद्यावरून सरकवून ऑफ शोल्डर लूक देता येतो. हे स्वेटर थंडीपासून बचावही करेल. त्यामुळे ग्लॅमरस दिसण्यासाठी शॉर्ट ड्रेसेस घालण्याची गरज नाही. स्वेटर आणि जीन्स घालूनही तुम्ही स्टायलिश दिसू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या