Christmas Makeup: ख्रिसमस पार्टीमध्ये हटके दिसायचंय? असे व्हा तयार
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Christmas Makeup: ख्रिसमस पार्टीमध्ये हटके दिसायचंय? असे व्हा तयार

Christmas Makeup: ख्रिसमस पार्टीमध्ये हटके दिसायचंय? असे व्हा तयार

Published Dec 25, 2023 06:15 PM IST

Makeup Tips for Christmas 2023: ख्रिसमस पार्टीमध्ये तुम्हाला सर्वांमध्ये उठून दिसायचं असेल तर या मेकअप टिप्स फॉलो करा. तुम्हाला हटके लूक मिळेल.

ख्रिसमस पार्टीसाठी मेकअप टिप्स
ख्रिसमस पार्टीसाठी मेकअप टिप्स (freepik)

Tips to Get Ready for Christmas Party: वर्षाचा शेवटचा मोठा सण म्हणजेच ख्रिसमस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. बरेच लोक त्यांच्या घरी पार्टी करतात. तर काही लोक आपल्या मित्र परिवार आणि कुटूंबासोबत एखाद्या हॉटेलमध्ये पार्टी करतात. पार्टी छोटी असो वा मोठी महिलांना यात सर्वांमध्ये उठून दिसायचे असते. आणि त्यासाठी त्या बऱ्याच दिवसांपासून तयारी करतात. आउटफिटपासून तर मेकअप पर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. तुम्ही सुद्धा ख्रिसमस पार्टीसाठी आउटफिट घेतला पण तयारी कशी करावी याबाबत कंफ्यूज आहात का? तर तुम्ही हे काही स्टायलिश लूक रिक्रिएट करु शकता. या मेकअप टिप्स फॉलो करून तुम्ही हटके लूक मिळवू शकता आणि सर्वांमध्ये उठून दिसू शकता.

स्टोन मेकअप

तुम्ही ख्रिसमस पार्टीसाठी अशा प्रकारचा मेकअप करू शकता. हा प्रकार मोठ्या डोळ्यांवर सुंदर दिसतो. या मेकअपमध्ये डोळ्याच्या पापण्यांवर लाइट पिंक किंवा न्यूट्रल रंग असलेली आयशॅडो लावली जाते. नंतर रेट्रो स्टाइल विंग आयलायनर लावले जाते. आणि शेवटी स्टोनने आय मेकअपला वेगळा लुक द्या.

शिमरी लुक

लाल आणि पांढऱ्या रंगाच्या आउटफिट्ससोबत या प्रकारचा मेकअप सुंदर दिसतो. शिमरी लुकसाठी बेसमध्ये मॅट फाउंडेशन वापरा. या लुकमध्ये ओठांसाठी गुलाबी टोनचा लाइट कलर निवडा. नंतर गालावर हायलाइटर वापरा आणि डोळ्यांवर शिमरी आयशॅडो लावा.

मिरर वापरा

तुम्ही मेकअप अनेक प्रकारे करु शकता. युनिक लुकसाठी मेकअपमध्ये मिररचा वापर करा. असा मेकअप तुम्हाला खास लुक देण्यास मदत करतो. मिररच्या मदतीने तुम्हाला ख्रिसमस पार्टीसाठी एक वेगळा लुक रिक्रिएट करता येईल. या लुकने तुम्ही सर्वात वेगळे दिसाल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner