
Merry Christmas: ख्रिश्चन धर्मातील सगळ्यांत मोठा सण म्हणजे ख्रिसमस. या दिवस हा सण जगभरात साजरा केला जातो. लोकांसाठी ख्रिसमस हा सर्वात खास दिवस आहे, कारण या दिवशी प्रभु येशूचा जन्म झाला असे मानले जाते. या दिवशी, लोक चर्चमध्ये जातात आणि प्रार्थना करतात. या सणामध्ये खास केकही बनवले जातात. लोक अनेक दिवस आधीच ख्रिसमस साजरे करण्याची तयारी सुरू करतात आणि या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. भारतात तसेच जगातील अनेक देशांमध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु असे काही देश आहेत जिथे ख्रिसमस साजरा केला जात नाही. कोणते आहेत हे देश आणि सेलिब्रेशन न करण्यामागचं कारण काय याबद्दल सांग.
भारताच्या शेजारी म्हणजे भूतान. या देशात ख्रिसमसच्या दिवसाला फारसे प्राधान्य दिले जात नाही.अगदी हा सण इथल्या कॅलेंडरचा भागही नाही. या देशातील लोक ७५ टक्के लोक बौद्ध धर्मावर विश्वास ठेवतात आणि अंदाजानुसार, भूतानमध्ये फक्त १ टक्के लोकसंख्या ख्रिश्चन धर्माची आहे.
पाकिस्तानमध्ये देखील ख्रिसमस साजरा केला जात नाही. पण, या दिवशी इथल्या लोकांना या दिवशी सुट्टी असते. याचे कारण म्हणजे कारण २५ डिसेंबर हा पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची जयंती आहे.
माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून ख्रिसमसचा सण साजरा केला जात नाही. येथे लोक धार्मिक भावनांमुळे ख्रिश्चन सण ख्रिसमस साजरा करत नाहीत.
सोमालियामध्येही ख्रिसमसच्या सणवार बंदी घालण्यात आली आहे. माहितीनुसार, धार्मिक भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
ख्रिसमस न साजरे करणाऱ्या देशांबद्दल बोलायचे झाले तर इस्लामिक देश इराणचाही त्यात समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे ख्रिसमस डे साजरा करण्यावर बंदी आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या
