Christmas Cake Recipe: यंदाच्या ख्रिसमसला घरीच बनवा चविष्ट केक, इथे आहे आजपर्यंतची सर्वात सोपी रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Christmas Cake Recipe: यंदाच्या ख्रिसमसला घरीच बनवा चविष्ट केक, इथे आहे आजपर्यंतची सर्वात सोपी रेसिपी

Christmas Cake Recipe: यंदाच्या ख्रिसमसला घरीच बनवा चविष्ट केक, इथे आहे आजपर्यंतची सर्वात सोपी रेसिपी

Dec 24, 2024 10:08 AM IST

Easy Cake Making Recipes In Marathi: आज आम्ही तुम्हाला ख्रिसमसला कोणता केक बनवायचा, कोणता केक खायला चविष्ट असेल आणि तुमच्या संध्याकाळच्या पार्टीसाठी कोणता ख्रिसमस केक सर्वोत्तम असेल ते सांगणार आहोत.

Homemade Cake Recipe In Marathi
Homemade Cake Recipe In Marathi (freepik)

Christmas 2024 Recipes In Marathi:  यावर्षी २५ डिसेंबर रोजी बुधवारी जगभरात ख्रिसमस साजरा केला जाणार आहे. ख्रिसमसच्या खास प्रसंगी केक बनवणे हा या सणाचा अविभाज्य भाग आहे. जर तुम्ही बाजारातून नाही तर घरी केक बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही इथून आयडिया घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला ख्रिसमसला कोणता केक बनवायचा, कोणता केक खायला चविष्ट असेल आणि तुमच्या संध्याकाळच्या पार्टीसाठी कोणता ख्रिसमस केक सर्वोत्तम असेल ते सांगणार आहोत. तुम्ही हा ख्रिसमस-स्पेशल केक आधीच बेक करू शकता आणि हवाबंद जारमध्ये ठेवू शकता. चला जाणून घेऊया केकची रेसिपी...

ख्रिसमस केक साठी साहित्य-

-१५० ग्रॅम वाळलेल्या क्रॅनबेरी

-१५० ग्रॅम मनुका

-२ चमचे संत्र्याची साल

-१५० ग्रॅम लोणी

-१ टीस्पून दालचिनीपूड

-३ अंडी

-१ टीस्पून व्हॅनिला इसेन्स

-१० काजू

-१ लिंबू

-१५० मिली संत्र्याचा रस

-२०० ग्रॅम मैदा

- १/४ टीस्पून लवंग पावडर

- १/२ टीस्पून बेकिंग पावडर

-१७५ ग्रॅम ब्राऊन साखर

ख्रिसमस केक रेसिपी-

सर्व प्रथम, एका मोठ्या भांड्यात क्रॅनबेरी आणि ड्रायफ्रूट्स घाला. यानंतर त्यात लिंबाचा रस, संत्र्याचा रस आणि संत्र्याची साल घाला. ड्रायफ्रुट्स रसात रात्रभर भिजवा. आता ओव्हन १६० डिग्री सेंटीग्रेडवर गरम करा. भिजवलेल्या ड्रायफ्रूट्सचे मिश्रण कढईमध्ये घाला, कढईमधील मिश्रण उकळू द्या. ३ ते ४ मिनिटे उकळवा. गॅसवरून काढून थंड होऊ द्या. एका भांड्यात मैदा आणि बेकिंग पावडर मिक्स करा. आता बाजूला ठेवा. दुसऱ्या भांड्यात लोणी आणि साखर एकत्र फेटून घ्या. अंडी घालून चांगले मिसळा.

आता अंड्याच्या मिश्रणात काजू, व्हॅनिला इसेन्स, दालचिनी आणि लवंग पावडर घालून चांगले मिक्स करा. ड्रायफ्रुट्सचे मिश्रण रस आणि पिठाच्या मिश्रणात मिसळा. सर्वकाही नीट फोल्ड करा. हे मिश्रण एका बेकिंग डिशमध्ये घाला आणि चमच्याने समान रीतीने सेट करा. बेकिंगसाठी तुम्ही गोल किंवा चौकोनी डिश वापरू शकता.केक ५० मिनिटे बेक करा. केकला ओव्हनमध्ये काही मिनिटे सोडा. केक बाहेर काढा आणि पूर्णपणे थंड करा. आता तुम्ही एका काचेच्या हवाबंद बरणीत किंवा डब्यात ठेऊ शकता.

Whats_app_banner