Health Benefits of Guava Leaves: हंगामी फळे आरोग्यासाठी खूप प्रभावी असतात. हिवाळ्यात मिळणारे पेरू हे अतिशय सामान्य फळ आहे. ज्याचे फायदे लोक सहसा फारसे मनावर घेत नाही. पण पेरू रोज खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते. त्याचबरोबर हे फळ बद्धकोष्ठतेसारख्या इतर अनेक आजारांवर गुणकारी आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पेरूचे फळच नाही तर त्याची पाने देखील खूप प्रभावी आहेत. ही पाने रोज खाल्ल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात. जाणून घ्या पेरूची पाने खाण्याचे फायदे.
पेरूची पाने तोंडाची कॅव्हिटी आणि हिरड्यांमधील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी प्रभावी आहेत. दररोज सकाळी दोन ते तीन पेरूची पाने चावून खाल्ल्याने दातांची कॅव्हिटी आणि श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
जर तुम्ही दररोज जेवणानंतर पेरूच्या पानांचा चहा प्यायला तर ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. पेरूच्या चहामध्ये असलेले कंपाउंड सुक्रोज आणि माल्टोज या दोन प्रकारच्या साखरेचे शोषण रोखतात.
लो डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच एलडीएल शरीरात वाढल्यास हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचते. न्यूट्रिशन अँड मेटाबॉलिझम स्टडीमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार पेरूच्या पानांचा चहा प्यायल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.
जर तुम्ही दररोज पेरूच्या पानांचा चहा प्यायला तर ते कॉम्प्लेक्स कार्ब्सचे साखरेत रुपांतर होण्यापासून प्रतिबंधित करते. हे पोटाची चरबी लवकर कमी करण्यास मदत करते.
पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह जास्त प्रमाणात असते. या पानांचा अर्क घेऊन प्यायल्यास सर्दी-खोकल्यापासून लवकर आराम मिळतो. एवढेच नाही तर घसा खवखवणे आणि श्वसन मार्गाच्या संसर्गापासूनही संरक्षण करते.
दररोज पेरूचा चहा प्यायल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते आणि अधिक गाढ झोप येण्यास मदत होते. हे मज्जासंस्था आणि मन शांत करते. ज्यामुळे गाढ झोप लागते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)