Social Media: सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक वेळा विचित्र फूड कॉम्बिनेशनचे (viral food video) व्हिडीओ व्हायरल होत असतात. भारतात आपल्या आवडत्या पदार्थांना अनेक गोष्टीत मिक्स केले जाते. आपल्याकडेच जास्तीत जास्त प्रयोग होतात. खाण्याच्या या प्रयोगांमध्ये पास्ता हा सर्वात आवडता आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की हे अनेक प्रकारे बनवता येते आणि ते बनवणे खूप सोपे आहे आणि ते सर्व दुकानांमध्ये सहज उपलब्ध आहे. भारतीय लोकांना 'देसी पास्ता' चांगलाच माहीत आहे. याची एक नवीन रेसिपी आजकाल खूप व्हायरल होत आहे. ही रेसिपी म्हणजे भारतीय ग्रेव्हीमध्ये बनवला जाणारा पास्ता आहे.
@Chandlersharesfood ने त्यांच्या इंस्टाग्राम रील्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये आम्हाला तपकिरी 'सॉस' ने भरलेले पॅन दिसत आहे. व्हिडिओचा मजकूर असा आहे, "जेव्हा तुमचा कुक छोलेच्या ग्रेव्हीमध्ये पास्ता बनवतो".
या इंस्टाग्राम पोस्टला आतापर्यंत ४ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट सेक्शनही लोकांच्या प्रतिक्रियांनी भरलेला आहे. काही लोकांना हा पदार्थ आवडला नाही तर काहींना वाटले की ते चवीला चांगले आहे. स्विगी इंस्टामार्टनेही रीलवर कमेंट केले. "हे इटालियन फूड आहे की देसी?" असे लिहिले होते. या शिवाय बाकीच्या युजर्सनेही कमेंट्स केल्या आहेत. "इटालियन दाल ढोकळी.", “इंडो-चायनीज चांगले आहे पण, मला माझ्या पास्त्यात हळद नको आहे.”, "रविवारी दुपारी, जेव्हा मी म्हणतो की मला भूक लागली आहे, तेव्हा माझ्या आईच्या मनात काही असे विचित्र विचार येतात.", "रोटी/पराठा बरोबर खावा की असाच खावा याबद्दल संभ्रम आहे." "मला तुमची कुकची फ्यूजन कल्पना आवडते. पुढील मास्टरशेफ स्पर्धक!"
व्हायरल फ्यूजनबद्दल तुम्हाला काय वाटले? तुम्हाला ते खायला आवडेल का? खाली कमेंट्स करून आम्हाला कळवा.
संबंधित बातम्या