Benefits of Eating Chocolate: व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस खूप खास असतो. रोज डे आणि प्रपोज डे नंतर तिसऱ्या दिवशी चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी कपल्स एकमेकांना चॉकलेट देऊन त्याच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करतात. चॉकलेटचा वापर केवळ प्रेम साजरे करण्यासाठीच केला जात नाही तर ते खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात. पौष्टिकतेनेयुक्त चॉकलेट तुमच्या प्रेमळ नात्यातही विशेष भूमिका बजावू शकते. चला तर मग जाणून घेऊया डार्क चॉकलेट खाण्याचे आरोग्याला कोणते फायदे होतात.
नात्यात प्रेमासोबतच इंटीमेसी देखील महत्त्वाची असते. डार्क चॉकलेट पुरुषांचे लैंगिक आरोग्य सुधारते, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. कोकोआमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे शरीरात रक्त प्रवाह सुधारतात. शरीराच्या प्रत्येक भागामध्ये तसेच खाजगी भागात रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे झाल्यामुळे लैंगिक शक्ती वाढते.
डार्क चॉकलेट खाल्ल्याने तणाव आणि नैराश्य यासारख्या समस्याही कमी होतात. अभ्यासात असे म्हटले आहे की उच्च फ्लॅव्हनॉल कोको खाल्ल्याने मेंदूतील रक्त प्रवाह देखील सुधारतो. त्यामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्तीही सुधारते. डार्क चॉकलेट मोठ्यांसोबतच वृद्धांसाठीही फायदेशीर आहे.
डार्क चॉकलेट शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल वाढवते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. त्यामुळे फॅट कमी वाढते आणि हृदयाच्या आरोग्यालाही हानी पोहोचत नाही.
डार्क चॉकलेट खाल्ल्याने उच्च रक्तदाबापासून आराम मिळतो आणि हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्यही सुधारते. संशोधनानुसार आठवड्यातून तीन वेळा डार्क चॉकलेट खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्याला होणारा धोका टाळता येतो.
आरोग्यसोबतच तुमचे सौंदर्य रक्षणातही चॉकलेट पुढे आहे. संशोधनात असे म्हटले आहे की डार्क चॉकलेट खाल्ल्याने त्वचेला उन्हापासून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)