Chocolate Day 2024: पार्टनरसाठी बनवा टेस्टी चॉकलेट सँडविच, चॉकलेट डे आणखी खास बनवेल ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chocolate Day 2024: पार्टनरसाठी बनवा टेस्टी चॉकलेट सँडविच, चॉकलेट डे आणखी खास बनवेल ही रेसिपी

Chocolate Day 2024: पार्टनरसाठी बनवा टेस्टी चॉकलेट सँडविच, चॉकलेट डे आणखी खास बनवेल ही रेसिपी

Published Feb 08, 2024 09:44 PM IST

Chocolate Day Recipe: चॉकलेट डे निमित्त आपल्या पार्टरनसाठी काही खास बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही चॉकलेट सँडविचची ही रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी झटपट तयार होते.

चॉकलेट सँडविच
चॉकलेट सँडविच (freepik)

Chocolate Sandwich Recipe: व्हॅलेंटाईन वीकमधील तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. ९ फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या या दिवशी लव्हर्स आपल्या पार्टनरला चॉकलेट गिफ्ट करतात. तुम्हाला तुमच्या पार्टनरचा दिवस चॉकलेट सारखा गोड करायचा असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी चॉकलेट सँडविच बनवू शकता. नेहमीचं चॉकलेट केक, पेस्ट्री, ऑइस्क्रिम ऐवजी तुम्ही हे सँडविच बनवून त्यांना सरप्राईज करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही हे चॉकलेट सँडविच सकाळी नाश्त्या, स्नॅक्स टाईममध्ये किंवा डेझर्ट म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकता. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. त्यामुळे मुलं सुद्धा आपल्या गर्लफ्रेंड किंवा बायकोसाठी हे सहज बनवू शकतात. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे चॉकलेट सँडविच.

चॉकलेट सँडविच बनवण्यासाठी साहित्य

- ६ ब्रेड स्लाइस

- १ कप डार्क चॉकलेट

- १ कप बटर

- १ कप मिक्स ड्राय फ्रूट्स (कापलेले)

चॉकलेट सँडविच बनवण्याची पद्धत

हे टेस्टी सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत चॉकलेट वितळण्यासाठी मध्यम आचेवर ठेवा. तुम्ही हे डबल बॉइल पद्धतीने सुद्धा वितळवू शकता. आता ब्रेडच्या स्लाइसवर बटर लावून घ्या. नंतर त्यावर वितळलेले चॉकलेट लावा. आता त्यावर ड्रायफ्रूट्स टाका आणि वर दुसरी ब्रेड ठेवा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात फ्रेश फ्रूट्स किंवा चोको चिप्स सुद्धा टाकू शकता. आता तव्यावर थोडेसे बटर टाकून गरम करा. नंतर मध्यम आचेवर तयार केलेले सँडविच भाजून घ्या. दोन्ही बाजूने नीट भाजून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या. तुमचे टेस्टी चॉकलेट सँडविच तयार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे कट करून यावर चॉकलेट किसून किंवा चॉकलेट सिरपने गार्निश करू शकता.

Whats_app_banner